पिंपरी : परदेशातून परतलेल्या दोन तरूणी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह

परदेशातून परतलेल्या २२ व २३ वर्षीय तरूणी आज (ता.१) ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
Omicron Variant
Omicron Variantesakal
Summary

परदेशातून परतलेल्या २२ व २३ वर्षीय तरूणी आज (ता.१) ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

पिंपरी - परदेशातून परतलेल्या २२ व २३ वर्षीय तरूणी (Girls) आज (ता.१) ओमिक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron Positive) आढळल्या आहेत. ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या तरुणाच्या संपर्कातील सगळ्यांच्या कोविड चाचण्या (Covid Test) करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शहरात परदेशातून आलेल्या प्रवाशांचीदेखील क्षेत्रीय कार्यालयास्तरावर सर्व्हेक्षण सुरू आहे. यात परदेशातून आलेल्या नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३८ असल्याचे समोर आले होते. त्या ३८ रूग्णांपैकी ओमीक्रॉन पॉझिटिव्ह संख्या १४ आहे. तसेच त्यांच्या संपर्कांतील पॉझिटीव्ह रूग्णसंख्या २८ आहे. संपर्कांतील २८ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ओमीक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण संख्या ११ आहे. दरम्यान या तरूणी रॅन्डम तपासणीमध्ये ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत. त्यानंतर पुढील चाचणीसाठी जेव्हा स्वॅब पाठवण्यात आले, त्यात ह्या तरुणी ओमीक्रॉन पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे. या रूग्णांची प्रकृतीस्थिर असून त्यांना रूग्णालयात दाखल घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

Omicron Variant
पिंपरी : 'हनी ट्रॅप' करुन खंडणी उकळणारी परिचारिका अटकेत

दरम्यान, ६९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी ४७ रूग्ण पुन्हा दहाव्‍या दिवशी तपासणीअंती अहवाल नकारात्मक आला आहे. या रूग्णांना घरी सोडण्यात आले असून गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड तपासणी करण्याचे कामकाज सुरू आहे.

ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर

ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या तरुणाच्या संपर्कातील सगळ्यांच्या कोविड चाचण्या करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती महाप्रशासनाकडून देण्यात आली आहे. यात तरुणाच्या संपर्कातील दोघंही जण कोविड निगेटिव्ह आढळून आलेत. सध्या ओमीक्रॉन पॉझिटिव्ह तरुणावर रुग्णालयाच उपचार सुरु आहे. तूर्तास तरुणाला कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाही. सध्याच्या घडीला एकूण १४ ओमीक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यासाठी बीएमसीकडून वेळीच खबरदारीची पावले उचलली जात आहेत. अजूनपर्यंततरी ओमीक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com