Pimpri : अनधिकृत पार्किंग, सायकल ट्रॅक गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil

अनधिकृत पार्किंग, सायकल ट्रॅक गायब

वाकड : काळेवाडीत विकसित झालेल्या बीआरटीएस रस्त्यामुळे परिसराची शोभा वाढली. अतिक्रमणामुळे हा मार्ग जणू अनधिकृत पार्किंगची अधिकृत जागाच बनला आहे. पालिकेने लावलेली झाडे चोरीला गेली तर पादचारी मार्ग गायब झाला आहे. आपण चौकशी करून हा मार्ग वाहतूक व नागरिकांसाठी खुला करावा, अशी कैफियत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राद्वारे काळेवाडी रहिवाशांनी मांडली आहे.|

स्मार्ट सिटी अंतर्गत हा रस्ता झाला तो विकसित करताना, जनहित लक्षात घेत पादचाऱ्यांसाठी फुटपाथ, सायकल ट्रॅक विकसित केला. पर्यावरण संवर्धनासाठी पदपथावर दहा फूट अंतरावर झाडे लावण्यात आली. याचा आनंद आहे मात्र दुर्दैवी बाब अशी की हा फुटपाथ, जनतेच्या वापरात येत नाही, सायकल ट्रॅकचा आनंद घेता येत नाही, याचे कारण म्हणजे रस्त्यात झालेली अधिकृत पार्किंग. अन झालेली दुरवस्था या रस्त्यात मोठी चारचाकी वाहने लावली जातात, दहा फूट अंतरावर झाडे दिसत नाहीत. ही लावलेली झाडे हटविण्यात आली, का ती चोरीला गेली का झाडे लागलीच नाहीत, याचा शोध आपण घ्यावा, ती छाटली असतील तर दोषींवर कारवाई करावी. सायकल ट्रॅक चालू करावा अतिक्रमण व पार्किंग हटवून फुटपाथ चालण्यायोग्य करावा अशी विनंती पत्रात केली आहे.

loading image
go to top