Hinjawadi : हिंजवडीत सोसायटी राहिवाशांचे विविध मागण्यांसाठी अनोखे आंदोलन

आम्ही फसलो तुम्ही फसू नका; सोसायटी धारकांची आर्त हाक
Unique protest of society residents various demands in Hinjewadi against builder pune
Unique protest of society residents various demands in Hinjewadi against builder punesakal

हिंजवडी : आयटी पार्क हिंजवडीतील गोदरेज २४ या उच्चभ्रु सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी बिल्डरच्या विरोधात शनिवारी (ता. ६) दुपारी साडे बारा वाजता अनोखे आंदोलन केले.

बिल्डरच्या सुरू असलेल्या दुसऱ्या प्रकल्पावर जाऊन फसवणूकीबाबत ग्राहकात जनजागृती अन बिल्डरची मोठी बदनामी केली. येथील गोदरेज २४ या सुमारे दीड हजार सदनिका असलेल्या च्या सोसायटी रहिवाशांना बिल्डरने घर घेताना अनेक दिवा स्वप्ने दाखवली. अँमिनिटीजची पूर्तता केलीच नाही या शिवाय ज्या मूलभूत आणि अत्यावश्यक सेवा आहेत त्याही पुरविल्या नाहीत.

पिण्याचे पाण्याची सुविधा नाही, दुकाने, स्कुल, गेट नाही एसटीपी प्लांट काम करत नाही. अग्निशमन केंद्राच्या समोर अनधिकृत पार्किंग केली आहे आशा विविध समस्येसाठी ते बिल्डरकडे पाठपुरावा करूनही वर्षभरापासून बिल्डर टाळाटाळ करत असल्याने बिल्डरचे तोंड उघडण्यासाठी सोसायटी रहिवाशांनी अनोखी शक्कल लढवत आज आंदोलन केले.

ज्या बिल्डरने त्यांचा प्रकल्प उभारला आहे त्या बिल्डरची म्हाळुंगे हद्दीत मुळानदी काठी रिव्हर साईड टू नावाच्या प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. शनिवारी-रविवारी येथे ग्राहक फ्लॅट पाहण्यासाठी येतात याचाच फायदा घेत शनिवारी हे सर्व रहिवाशी रिव्हर टू प्रकल्पावर पोहचले हातात फलक घेऊन,

विविध मागण्यांसाठी बिल्डरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्ही फसलो तुम्ही फसू नका अशी घोषणाबाजी करत तेथे येणाऱ्या प्रत्येल ग्राहकाला झालेल्या फसवणुकीची माहिती देणारे पत्रक वाटण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com