esakal | 'दम असेल तर इथे ये' असं म्हणाला अन्‌ पिंपरीत राडा झाला 
sakal

बोलून बातमी शोधा

'दम असेल तर इथे ये' असं म्हणाला अन्‌ पिंपरीत राडा झाला 
  • दोन्ही टोळक्‍यावर गुन्हा दाखल झाला. 

'दम असेल तर इथे ये' असं म्हणाला अन्‌ पिंपरीत राडा झाला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : टोळके तरुणाला मारहाण करून निघून गेले. त्यानंतर टोळक्‍यातील एकाने पुन्हा तरुणाला फोन करून "दम असेल तर इथे ये आम्ही येथे आहोत' असा म्हणाला. मारहाण झालेला तरुण त्याच्या साथीदारांसह टोळके राहत असलेल्या पिंपरीतील नेहरूनगर परिसरात गेला. मात्र, तेथे त्याला मारहाण करणारे कोणीही सापडले नाहीत, त्यामुळे तरुणासोबतच्या शंभर जणांच्या टोळक्‍याने परिसरातील वाहनांना लक्ष्य केले. कोयते, दगडांनी महागड्या वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवून राडा घातला. याप्रकरणी दोन्ही टोळक्‍यावर गुन्हा दाखल झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नेहरूनगर येथील घटनेप्रकरणी पोलिसांनी आशिष बन्सी जगधने (रा. श्रीकृष्ण मंदिराजवळ, गवळीमाथा, टेल्को रोड, भोसरी), अक्षय अशोक तुरकने (रा. नेहरूनगर), इरफान युनूस शेख (रा. इंद्रायणीनगर, भोसरी), जावेद निसार औटी (रा. शंभूराजे कॉलनी, भोसरी), जितेश मधुकर मंजुळे (रा. खराळवाडी, पिंपरी) यांना अटक केली आहे, तर काही वेळातच अजमेरा येथे झालेल्या मारहाण व वाहन तोडफोडीप्रकरणी राहुल देवकर (रा. नेहरूनगर), महेश मांजळकर, विजय पवार, चिक्‍क्‍या जाधव, संतोष कट्टीमनी, सागर तांदळे, अनिकेत (सर्व रा. नेहरूनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी बन्सी रंगनाथ जगधने (रा. गवळीमाथा) यांनी फिर्याद दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शुक्रवारी (ता. 30) सायंकाळी जितेश मंजुळे हा नेहरूनगर येथील चौपाटीजवळ असताना चिक्‍या जाधव व राहुल देवकर यांच्या टोळक्‍याने त्याला मारहाण केली. मंजुळे याने मित्रांना तेथे बोलावून घेतले. मात्र, तोपर्यंत टोळके तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा टोळक्‍यातील देवकर याचा मंजुळेला फोन आला. "दम असेल तर इथे ये आम्ही येथे आहोत' असे तो म्हणाला. त्यामुळे मंजुळे हा त्याच्या साथीदारांसह देवकर व त्याचे टोळके राहत असलेल्या नेहरूनगर परिसरात गेला. तेथे त्याला मारहाण करणारे कोणीही सापडले नाहीत. त्यामुळे मंजुळे सोबत आलेल्या शंभर जणांच्या टोळक्‍याने परिसरातील वाहनांना लक्ष्य केले. कोयते, दगडांनी महागड्या वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेचा वचपा काढण्यासाठी राहुल देवकर, महेश मांजळकर, विजय पवार, चिक्‍या जाधव, संतोष कट्टीमनी, सागर तांदळे व त्यांचे साथीदारांनी रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा अजमेरा येथे राडा घातला. पिंपरीतील अजमेरा येथील वास्तू उद्योग येथील पिल्ले हॉलसमोरील रस्त्यावर उभ्या केलेल्या दोन बसच्या काचा लाकडी दांडक्‍याने फोडल्या. त्यास विरोध केला असता, मंजुळेच्या टोळीतील आशिष जगधने यांच्या वडिलांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर सर्व जण तेथून पसार झाले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.