ते आले...दुकानात शिरले अन् तलवार, कोयत्यांनी...

ते आले...दुकानात शिरले अन् तलवार, कोयत्यांनी...

पिंपरी : तलवार व कोयत्याने दुकानाची तोडफोड करीत दहशत माजविल्याची घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

अमोल रामदास गुंजाळ, साहिल सनाउल्ला शहा (दोघेही रा. गजानन महाराजनगर, मॅगझीन चौक, दिघी), गणेश भिका गुंड (रा. शास्त्री चौक, भोसरी, मूळ-बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुनील चंद्रभान जमदाडे (वय 39, रा. विशाल गार्डन फेज 5, चाकण) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांचे भोसरीतील दिघी रोड येथे स्टेशनरीचे दुकान आहे. शनिवारी (ता. 11) दुपारी पावणे एकच्या सुमारास आरोपी हे फिर्यादीच्या दुकानात शिरले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवीगाळ व दमदाटी करीत फिर्यादीच्या कामगारास धक्काबुक्की करून आरोपी अमोल गुंजाळ याने जबरदस्तीने गल्ल्यातील बाराशे रुपये उचलले, त्यास दुकानातील कामगार नटराज मोहिते यांनी अटकाव केला असता तिघांनी त्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्यानंतर दुकानाच्या काचेवर तलवार व कोयत्याने मारून तोडफोड करीत दहशत माजविली. या बाबत भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com