Vande Bharat Express : वंदे भारत रेल्वेगाडीचे दापोडी करांनी केले उत्साहात स्वागत | Vande Bharat train enthusiastically welcomed in Dapodi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vande Bharat train enthusiastically welcomed in Dapodi

Vande Bharat Express : वंदे भारत रेल्वेगाडीचे दापोडी करांनी केले उत्साहात स्वागत

जुनी सांगवी : गाडी क्रमांक02225 मुंबई पुणे सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीचे शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी तिरंगा झेंडा दाखवून व एकमेकास पेढा भरून ,पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कुतूहल व उत्सुकता लागलेल्या वंदे भारत रेल्वेगाडी दापोडी स्टेशनवरून मार्गक्रमण करताना विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज दाखवत भारत माता की जय च्या जयघोषात जल्लोषात स्वागत केले. वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला पाहण्यासाठी दापोडीत नागरिकांनी गर्दी केली होती.

यावेळीे, स्टेशन मास्तर दीपक शर्मा, उषा वाघमारे, एस अँड टी स्टॉप प्रसाद टकले,राकेश शिरसाट,शरद पाटील ,संतोष गुंड, दिपाली लडकत,आनंद सोनटक्के, मीना पळसकर,माजी नगरसेवक राजु बनसोडे, अलेकदास मोसिन शेख, डब्बू बबलू गायकवाड, नरेश सुतार, जाफरभाई शेख वीजू बनसोड, पाल नायर, दिलराज पिल्ले, आधी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.