पिंपरी : चिखलीत भाजी विक्रेत्यांचं हे काय चाललंय? तुम्ही बघा तर...

पिंपरी : चिखलीत भाजी विक्रेत्यांचं हे काय चाललंय? तुम्ही बघा तर...

पिंपरी : चिखली सेक्टर क्र. ११ येथील रहिवासी भागात अनधिकृत पद्धतीने घाऊक भाजी  मार्केट सुरू झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. नागरिक भयभीत झाल्याने भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी हलविण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

मोशी भाजी मार्केटमध्ये गर्दी वाढत असल्याने या ठिकाणी जाण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. कोरोनामुळे हा परिसर पूर्ण सील करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच असलेल्या सेक्टर क्र. 11 मधील स्टेटस मिठाई चौकात भाजी विक्री सुरू केली आहे. 20 ते 40 भाजीचे टेम्पो व 100 ते 200 भाजी विक्रेते इथे दररोज पहाटेपासून गर्दी करत आहेत. सकाळी 11 पर्यंत ही गर्दी हटत नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रहिवासी झोन असल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही सोसाट्यांच्या प्रवेशद्वारावरच गर्दीचे चित्र दिसत आहे. स्थानिक नागरिक तीव्र विरोध करूनही भाजी विक्रेते ऐकत नाहीत. स्थानिक नगरसेवकांना  याबद्दल नागरिकांनी विनवणी करूनही अद्यापपर्यंत यावर काही निर्णय झाला नाही. नागरिक रस्त्यावर येऊन विरोध करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवासी कपिल मोरे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com