मतदानाचा हक्क बजावला पण, मतदारांमध्ये उडाला गोंधळ

आशा साळवी
Wednesday, 2 December 2020

निवडणुकीसाठी शहराची चार भागांत विभागणी केली होती. पदवीधरसाठी 43, तर शिक्षक मतदारसंघासाठी नऊ मतदान केंद्राची सोय केली आहे. केंद्रावर या सकाळच्या टप्प्यात मतदारांनी काहीअंशी गर्दी केली होती. दुपारनंतर गर्दी ओसरली. प्रत्येक केंद्रावर मतदारांचे थर्मल गन आणि ऑक्‍सिमीटरने शारीरिक तापमानाची तपासणी केली जात होती. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मतदानाची प्रक्रिया पार पडली.

पिंपरी : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. शहरातील 52 केंद्रांवर पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक केंद्रावर राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. काही केंद्रावर मतदार यादीतील चुकांमुळे गोंधळत उडाला. दरम्यान, सध्या पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मतदार संसर्गाच्या सावटाखाली दिसले. परिणामी पदवीधर, शिक्षक मतदार संघात नेमके किती टक्के मतदान होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


या निवडणुकीसाठी शहराची चार भागांत विभागणी केली होती. पदवीधरसाठी 43, तर शिक्षक मतदारसंघासाठी नऊ मतदान केंद्राची सोय केली आहे. केंद्रावर या सकाळच्या टप्प्यात मतदारांनी काहीअंशी गर्दी केली होती. दुपारनंतर गर्दी ओसरली. प्रत्येक केंद्रावर मतदारांचे थर्मल गन आणि ऑक्‍सिमीटरने शारीरिक तापमानाची तपासणी केली जात होती. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र, कोरोनामुळे कुठल्याही केंद्रावर रांग पहायला मिळाली नाही. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. थोड्या-थोड्या अंतराने शिक्षक मतपत्रिका घेऊन येत होते. शहर पातळीवर चुरस निर्माण झाल्याने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर बसूनच होते. मतदानासाठी आलेल्या मतदाराला आमच्या कार्यकर्त्याला मतदान करा, अशी गळ घालत होते. अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांनी प्रत्येक केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी


केंद्राच्या नावावरून गोंधळ

मतदानासाठी महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी वाघेरे केंद्र होते. पंधरा दिवसांपासून याची माहिती सर्वत्र पोहोचली होती. त्यानुसार प्रत्येकाने त्याच केंद्रावर हजेरी लावली. प्रत्यक्षात तिथे गेल्यावर केंद्र बदलल्याचे सांगण्यात आले. परंतु, सोमवारी (ता. 30) एका रात्रीत केंद्र बदलण्यात आले. मात्र, त्याची माहितीच शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह मतदारांना धावपळ करावी लागल्याने मोठी गैरसोय झाली. याविषयी तहसीलदार गीता गायकवाड यांनी महाविद्यालयऐवजी विद्यालय करावयाचे होते, असे सांगत "टायपिंग मिस्टेक' झाल्याचे सांगितले.

केंद्रावर दुसरेच नाव

चिंचवड स्टेशनला महात्मा फुले विद्यालय नेमके कुठे आहे, हे शोधण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागली. गुगल मॅपवरदेखील या शाळेचे नाव येत नसल्याने अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेकांचा वेळ वाया गेला. कारण महापालिकेच्या चिंचवड महात्मा फुले शाळेचे जुने नाव बदलून आता गंगाराम बहिरवाडे प्राथमिक शाळा आणि पानसरे उर्दू प्राथमिक शाळा असे केल्यामुळे बहुतांश मतदारांना महात्मा फुले विद्यालय केंद्र शोधण्यासाठी त्रास झाला. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी

बीएलओ कामाविनाच

पिंपरीगावातील महात्मा फुले महाविद्यालय केंद्रावर सकाळी सात वाजता खडकवासला येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक आले होते. त्यांना चिंचवड स्टेशनची शाळा शोधण्यासाठी नऊ वाजले. तोपर्यंत चिंचवडमधील विभाग अधिकाऱ्याने चिंचवडच्या तलाठी आणि त्यांचे संगणक कर्मचाऱ्यांना मतदार यादी तपासणीचे काम दिले. संबंधित बीएलओ शिक्षकांना "इलेक्‍शन ड्यूटी'चे आयडी कार्ड नसल्याचे सांगत बसून ठेवले. त्यांना नेहमीप्रमाणे कुठलीच कामे दिली नाही. तसेच ना नाश्‍ता दिला, अशी हकिगत चार बीएलओंनी "सकाळ' प्रतिनिधीला सांगितली.

मतदार यादीत चुका

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही दिवस अगोदर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्यात आली. या शेवटच्या काही दिवसांत अर्ज केलेल्या शंभर टक्के लोकांची नावे मतदार यादीत घेण्यात आली; पण ही नावे यादीत समाविष्ट करताना कोणत्याही प्रकारची पडताळणी केली नाही. त्यामुळे एकाच मतदारांचे नाव दहा, आठ वेळा यादीत आले, तसेच छायाचित्र नसलेले मतदार, नावातील चुका, चुकीचा ओळखपत्र क्रमांक आल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting on 52 polling Booth centre in Pcmc pune Graduate Election