वाकड : मुंबई-बंगळूर महामार्गापलीकडे विजेचा लपंडाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity power supply

मुंबई-बंगळूर महामार्गा पलिकडील विनोदे नगरच्या बहुतांश भागात व अनेक मोठ्या सोसायट्यात गेल्या अडीज महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.

वाकड : मुंबई-बंगळूर महामार्गापलीकडे विजेचा लपंडाव

वाकड - मुंबई-बंगळूर महामार्गा पलिकडील विनोदे नगरच्या बहुतांश भागात व अनेक मोठ्या सोसायट्यात गेल्या अडीज महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. तासन तास वीज गुल होत असल्याने वर्क फ्रॉम होम सूरु असलेल्या आयटी अभियंत्यांसह सर्वांनाच मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे.

विनोदे नगर परिसरात लहान मोठ्या वस्त्यांसह, अडोरा, ओपस ७७, वेस्टरीया, विनोदे वस्ती, इनसिगणिया, पॅव्हेलीयन ७६, पिका डेली तसेच अनेक लहान मोठ्या सोसायट्या असून सुमारे पाच ते सहा हजार नागरिक वास्तव्यास आहेत. यातील बहुतके जण आयटीत जॉब करतात तेही वर्क फ्रॉम होम. असे असताना एकदा गेलेली वीज तब्बल दोन तास ते दहा तासांपर्यंत गायप असते. फीडर गेले, लाईन कट झाली, डीपीत शॉट सर्किट झाले. रस्त्याचे काम सुरू आहे असे काहीही उडवा-उडवीची उत्तरे महावितरणकडून दिली जातात मात्र काय तो एकदाचा तोडगा काढून समस्या सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: Wakad Mumbai Bangalore Highway Beyond Electricity Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Electricitywakad