वाकड पोलिसांची मोठी कारवाई; अट्टल गुन्हेगारांकडून पाऊण किलो सोनं, एक क्विंटल चांदी जप्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

  • दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद 
  • वाकड पोलिसांची कारवाई
  • पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, एक पिस्तूल जप्त 

पिंपरी : दरोडा, जबरी चोरी, खून यासारख्या पंधरा गंभीर गुन्ह्यात काही वर्षांपासून फरारी असलेल्या व तब्बल नव्वद गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल गुन्हेगारासह त्याच्या मेहुण्याला वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन मोटारी, एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा एक कोटी 11 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय 31, रा. साई बाबा मंदिरासमोर, रामटेकडी, हडपसर), विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय 19, रा. पिसवली, कल्याण) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. 20 ते 26 सप्टेंबर या कालावधीत वाकड, निगडी व पिंपरीतील सराफी पेढी फोडण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, निगडीत घडलेल्या घटनास्थळापासून जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक मोटार पोलिसांना संशयास्पद अवस्थेत आढळली. या मोटारीचा शोध घेतला असता लोणी-काळभोर आणि लोणीकंद येथून त्याच प्रकारच्या दोन मोटारी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी सूत्रे खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात हलविली.

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

पुणे शहरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीवरून सराईत गुन्हेगार विकीसिंग आणि त्याची टोळी हे गुन्हे करीत असून विकीसिंग हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोटारीतून विकीसिंग फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून विकीसिंग आणि विजयसिंग यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोटारीत दोन लोखंडी कटावण्या, दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन मिळाला. तर, त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली. दोघांना न्यायालयात हजर केले असता दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

Image may contain: 15 people, people standing

दरम्यान, विकीसिंगच्या कुटुंबातील बहुतांश व्यक्ती सराईत गुन्हेगार आहेत. त्याचे वडीलही खुनाच्या गुन्ह्यात वीस वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगून आले आहेत. सध्या त्याच्या समवेत गुन्हे करताना त्याचे दोन मेहुणेही सामील असतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याने पोलिसांवरही केलाय गोळीबार 

विकीसिंगला अटक केल्यानंतर त्याच्याकडून वाकड व चिखली ठाण्यातील प्रत्येकी 5, देहूरोड -3, निगडी 6, चिंचवड, सांगवी, भोसरी, भोसरी एमआयडीसी ठाण्यातील प्रत्येकी 2, हिंजवडी, लोणी काळभोर, लोणीकंद, वालीव या ठाण्यातील प्रत्येकी 1 असे 34 गुन्हे उघडकीस आले. तो वारंवार जागा बदलून राहत असे. लष्करात नोकरीला असल्याची बतावणी करून खोली भाड्याने घ्यायचा. तो नेहमी शस्त्र स्वत:कडे बाळगत असल्याने त्याला पोलिसांनी अथवा नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास तो त्यांच्यावर हल्ला करायचा. यापूर्वी त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. वानवडी ठाण्याच्या हद्दीतील दोन खून आणि खडकी ठाण्यातील एका खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तो फरारी होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wakad police seized gold silver from the criminals