
वॉशिंग सेंटर चालकाला शिवीगाळ व बेदम मारहाण करीत वॉशिंग सेंटर बंद करण्याची धमकी दिली.
Pimpri Crime : वॉशिंग सेंटर चालकाला मारहाणप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेसह प्रदेश पदाधिकाऱ्यावर गुन्हा
पिंपरी - वॉशिंग सेंटर चालकाला शिवीगाळ व बेदम मारहाण करीत वॉशिंग सेंटर बंद करण्याची धमकी दिली. याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेसह, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस याच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
शिबु हरिदास (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, माजी सरचिटणीस सारंग कामतेकर यांचा मुलगा (वय २३), माजी नगरसेविका सीमा सावळे व त्यांच्या सोबतच्या १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे पिंपरी एमआयडीसी येथील एच ब्लॉक येथे वॊशिंग सेंटर असून व त्यांच्याकडे काम करणारी मुले संतोष व चेतन हे गाडी धुण्याचे काम करतात.
दरम्यान, येथे गाडी धुण्यासाठी आलेल्या कामतेकर यांच्या मुलाने सात ते आठ जणांचा जमाव बोलावून फिर्यादीला शिवीगाळ केली. सीमा सावळे यांनी फिर्यादी याना त्यांचा वॉशिंग सेंटरचा धंदा बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर सावळे यांनी अनुप मोरे याना फोन करून आठ ते दहा जणांना बोलावून घेतले. अनुप याने फिर्यादीला हाताने मारहाण केली तर त्याच्यासोबत आलेल्या जमावापैकी काही जणांनीही फिर्यादीला मारहाण केली. एका बाउंसरने फिर्यादीच्या पाठीत बॅट मारली. त्यानंतर काही वेळाने तेथे आलेल्या एकाने फिर्यादीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या सीसीटीव्हीचे खोडसाळपणे बटन दाबून नुकसान केले.