पिंपरी : 'हनी ट्रॅप' करुन खंडणी उकळणारी परिचारिका अटकेत

वाकड पोलिसांनी रहाटणीत कारवाई
हनी ट्रॅप
हनी ट्रॅपsakal

पिंपरी : हनी ट्रॅप करून खंडणी उकळणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. ही कारवाई रहाटणी येथे करण्यात आली. या प्रकरणात अटक केलेली महिला पुण्यातील ताडीवाला रोड येथे राहते. याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. आरोपी महिला पिंपळे सौदागर येथील एका रुग्णालयात परिचारिकेचे काम करीत होती. येथे फिर्यादी उपचार घेत असताना महिलेशी मैत्री झाली. मोबाईलवरून WhatsApp द्वारे चॅटिंग व संभाषण करून महिलेने फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. (Woman arrested for ransom by honey trap)

हनी ट्रॅप
पिंपरी चिंचवडकरांनो...'नो-व्हॅक्सीन नो एंट्री'!

त्यांच्या दोन -तीन वेळा भेटी झाल्या. याचा फायदा घेत संबंधित महिलेने तिच्याकडील व्हाटसअप चॅटिंग व मेसेज फिर्यादीच्या घरी व सोसायटीतील लोकांना दाखविण्याची धमकी दिली. तसेच पोलिसात तक्रार करण्यासह मुलींना फसवितो, अशी सोशल मीडियावर बदनामी करेन व स्वतः आत्महत्या करून गुन्ह्यात गुंतविण्याचीही धमकी देत वीस लाखांची खंडणी मागितली. फिर्यादीने भीतीपोटी महिलेला काही रक्कम दिली. त्यानंतरही महिला वारंवार फिर्यादीकडे पैशांची मागणी करीत असल्याने या त्रासाला कंटाळून फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर वाकड पोलिसांनी गुरुवारी (ता. ३०) दुपारी एकच्या सुमारास रहाटणीतील शिवार चौक येथील एका हॉटेलात सापळा रचला.(whatsapp chat)

हनी ट्रॅप
पिंपरी : महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

त्यावेळी तेथे आलेल्या आरोपी महिलेने फिर्यादी याना भेटून 'पैसे भेटल्यास तक्रार करणार नाही, प्रकरण मिटविते ' असे सांगून मागणी केलेली रक्कम स्वीकारली. त्याचवेळी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. या महिलेवर वाकड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता रविवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, बापूसाहेब धुमाळ, वंदू जिरे, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, प्रमोद कदम यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com