मावळ : धामणे येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

रविवार, 28 जून 2020

धामणे येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला.

बेबडओहोळ : धामणे येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेला हा चौथा रुग्ण असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

धामणे गावातील या २८ वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तिची कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या कोरोनाबाधित महिलेवर तळेगाव दाभाडे येथील मायमर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी (ता. २७) या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती तालुका आपत्ती नियंत्रण कक्षाचे समन्वयक राहुल चोकलिंगम यांनी दिली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिलेच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी तळेगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे पाठवण्यात येणार असल्याचे आढले बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी दिलीप सुर्यवंशी यांना सांगितले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने मावळवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवन मावळातील गावातही कोरोना आता चांगलाच पसरत आहे. गावोगावी उघडलेली दुकाने, सोशल डिस्टन्सिंचा फज्जा जागोजागी उडाला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क रहाण्याची गरज असल्याचे वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे दिसत आहे.