पिंपरीतील महिलांना सुंदर दिसण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार; कारण...

सुवर्णा नवले
सोमवार, 1 जून 2020

महिलांचे सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायावर आता मंदीचे सावट आले आहे.

पिंपरी : महिलांचे सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायावर आता मंदीचे सावट आले आहे. ग्राहकांसोबत सोशल डिस्टन्सिंग पाळून नेमका पार्लरचा व्यवसाय कसा करावा? या पेचात महिला ब्युटी पार्लर व्यावसायिक सापडल्या आहेत. शहरात बऱ्याच महिलांचा ब्युटी पार्लर घरगुती व्यवसाय असल्याने कुटुंबीयांची काळजी त्यांना भेडसावत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील आठवड्यात सलून व ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली आहे. शहरात शेकडो ब्युटी पार्लर आहेत. बऱ्याच महिला पार्लर चालक अद्यापही ऑर्डर स्वीकारत नाहीत. एखादे लग्न किंवा घरगुती सोहळा असल्यास अत्यावश्‍यक ऑर्डरच घेतल्या जात आहेत. बऱ्याच महिला चालकांचे दोन ते तीन महिन्यांचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर सुरू न झाल्यास व्यवसायाला खीळ बसण्याची भीती त्यांना सतावत आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पार्लरमधील वापरण्यात येणारी इलेक्‍ट्रीक साधने दोन महिन्यांपासून वापरात नसल्याने बिघाड होण्याची दाट शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर चालक महिलांनी पार्लरसाठी लागेल इतके विविध प्रकारचे क्रीम्स प्रॉडक्‍ट्‌स व साहित्य वर्षभर पुरेल इतके साठून ठेवले आहे. त्यातही मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे त्याचे पैसेही अडकून पडले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 लग्नसराईचा ऐन मोक्‍याचा हंगाम निघून गेला आहे. सणवार, इव्हेंट या मेकअप ऑर्डर हुकल्या आहेत. घराबाहेर न पडणाऱ्या महिलांनी अद्याप पार्लरमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

"पार्लरमध्ये आलेले नेमके कोणत्या परिसरातून व कसे येतात, हे पडताळून पाहणे कठीण आहे. घरगुती पार्लर असलेल्या चालकांनी बारकाईने काळजी घेऊनही संकट ओढवू शकते.''

- तनुजा राणे, ब्युटी पार्लर चालक, कासारवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women's beauty parlor business pimpri chinchwad