महिलांनो नवीन काही भन्नाट करण्याची इच्छा आहे, तर ही बातमी वाचा

सुवर्णा नवले
Thursday, 18 June 2020

- घरबसल्या महिलांचा हा आहे बिझनेस फंडा
- किड्‌स थ्रीडी व डिझायनर मास्क ठरतेय आकर्षण 
- कुटुंबाला आर्थिक हातभार

पिंपरी : घरात स्वस्थ बसून जमणार नाही. लॉकडाउनचा परिणाम असला म्हणून काय झालं? हाताला काम मिळायलाच हवं, त्यासाठी धडपड करणाऱ्या या हरहुन्नरी महिलांनी अनेक नवनवीन शक्कल लढविल्या आहेत. या रणरागिणींनी खचून न जाता ऑनलाइन बिझनेसचा फंडा वापरला आहे. एवढंच नव्हे, तर सोशल मीडियावर जबरदस्त मार्केटिंग देखील केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

सध्या पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिलांचे ब्युटी पार्लर, कापड व्यवसाय तसेच खाद्यपदार्थांच्या पूर्वापारपासून चालत आलेल्या व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे. मात्र, यातून उभारी घेत महिलांनी पुन्हा एकदा ऑनलाइन व्यवसायात उडी मारली आहे.

No photo description available.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निगडीतील अंकिता राऊत या सध्या घरगुती बनविलेले मसाले पदार्थांसह चटपटीत चिवडा, शेवसह अनेक पदार्थ तयार करीत आहेत. तसेच बऱ्याच महिलांनी ड्रेस डिझायनिंगसह फॅन्सी स्कार्फची ऑनलाइन जाहिरात केली आहे. हे फेस स्कार्फ पूर्णपणे तोंडाला गुंडळलेले असून केवळ डोळे उघडे राहत आहेत. हे दुचाकी व चारचाकीवर महिलांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. शिवाय महिलांचा लूकही यात वेगळा दिसत आहे. डिझायनर मास्क व पैठणीच्या मास्कला मागणी वाढली आहे. त्यामुळे महिला या व्यवसायाला अधिक प्राधान्य देऊ लागल्या आहेत. त्यामुळे टेलरिंगच्या व्यवसायाकडे महिलांचा कल वाढला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Image may contain: 1 person

हा आहे नवीन फंडा

चक्क महिलांनी स्वत:च्या पारंपरिक व्यवसायाला कलाटणी देऊन नवनवीन डिझायनर मास्क, किड्‌स मास्क व ज्येष्ठांसाठीचे नाविन्यपूर्ण मास्क तयार केले आहेत. याशिवाय ऍपरन, बॉडी सूट, फेस स्कार्फ, स्नीज गार्ड, डिजिटल बुक्‍स, ऑनलाइन कोचिंगसह, विविध पदार्थांची मेजवाणी देखील मार्केटिंगच्या माध्यमातून सुरु केली आहे. दिवसभर सोशल मीडियावर व्यवसायाची आर्थिक गणिते सुरु असतात. एकमेकींना ऑनलाइन किंमती व गुणवत्तेची विचारणा देखील होत असते. त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने बिझनेस करणाऱ्या महिला कामासाठी जुंपल्या आहेत. जवळपास हजारो रुपयांची कमाई दिवसभरात होत आहे.
 

सोशल मीडियावरही जाहिरातबाजी

पावसाळी फॅन्सी शूज, जॅकेट विक्रीचाही ऑनलाइन ट्रेंड जोमात सुरु आहे. त्याचप्रमाणे सुती कॉटन स्टोलचाही खप वाढला आहे. बऱ्याच जणींनी सोशल मीडियावर जोरदार जाहिरातबाजी केली आहे. ब्युटी पार्लरला गर्दी टाळता यावी यासाठी घरपोच ब्युटी पार्लरला ऑर्डर घेण्यासही महिलांनी सुरुवात केली आहे. तसेच ऑनलाइनसाठी ऑडिओ व व्हिडीओ बनविण्याच्या व्यवसायानेही उचल खाल्ली आहे. ऑनलाइन फुड व आईस्क्रिमचे क्‍लासेसही महिला घेत आहेत.

बाळांसाठी झबले, दुपटी, फीडींग गाऊन, मास्क, ऍपरन बनविण्याच्या खूप मोठ्या ऑर्डर मिळाल्या. माझी मुलगी अक्षंदा भोसले हिचे ऑनलाइन कोचिंग क्‍लासही सुरू आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठवी ते दहावी इंग्रजी माध्यामाचे ही शिकवणी आहे.

- विनया भोसले, टेलर, चिंचवडगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womens starts new business of mask at pimpri chinchwad