VIDEO : चिंचवड स्टेशनवरील पादचारी पुलाची स्थिती काय, जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

लॉकडाउनच्या कालावधीत पुणे ते मुंबई मार्गावर मालवाहतूक वगळता लोकल आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

पिंपरी : लॉकडाउनचा फायदा घेत प्रवाशांच्या सोयीसाठी चिंचवड स्टेशनवर उभारण्यात येत असणाऱ्या नव्या पादचारी पूलाचे काम वेळेअगोदर पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत या पुलाच्या उभारणीचे 70 टक्‍के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनच्या कालावधीत पुणे ते मुंबई मार्गावर मालवाहतूक वगळता लोकल आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नव्या पूलाची उभारणी करण्यासाठी आवश्‍यक असणारे लोखंडी स्पॅन टाकण्याचे काम ब्लॉक न घेता पूर्ण करणे रेल्वे प्रशासनाला शक्‍य झाले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या अवधीत स्टेशनवरील चारही प्लॅटफॉर्मना जोडणारे दोन लोखंडी स्पॅन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित 16 मीटरचा स्पॅन टाकण्याचे काम येत्या पंधरा दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. स्पॅन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जिना, छत, फरशी टाकण्याचे कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रवाशांना ठरणार फायदेशीर...
प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करता चिंचवड स्टेशनवर सध्या असणारा पादचारी पूल पुरेसा नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याठिकाणी नवीन पूल करण्याचे नियोजन केले होते. पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या एकाच पूलावर येणारा ताण हलका होण्यास मदत होणार आहे. हा पादचारी पूल चारही प्लॅटफॉर्मना जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांसाठी ते अधिक सोयीस्कर ठरणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउनच्या काळात रेल्वे प्रशासनाने नव्या पुलाच्या उभारणीचे बरेचसे काम कोणताही खंड न पाडता पूर्ण केले आहे. पुढल्या तीन महिन्यामध्ये पूलाचे पूर्ण काम होणे अपेक्षित असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. 

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग 

असा आहे नवा पादचारी पूल 

  • 6 मीटर रुंद 
  • 84 मीटर लांब 
  • चारही प्लॅटफॉर्म जोडणारा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on pedestrian bridge at Chinchwad station is 70 percent complete