थेरगावात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

  • बांधकाम सुरू असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला.

पिंपरी : बांधकाम सुरू असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना थेरगाव येथे घडली. कामगारांना सुरक्षिततेची साधने न पुरविता काम करण्यास लावून कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह मालकावर गुन्हा दाखल झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरेश भिमा म्हस्के (वय 36, रा. भगवाननगर, भूमकर चौक, वाकड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी पल्लवी म्हस्के यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बांधकाम ठेकेदार गणेश गुंडागळ, बांधकाम मालक लक्ष्मण सिताराम कुदळे (रा. गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सुरेश म्हस्के व आणखी एक कामगार बांधकामाच्या ठिकाणी काम करीत होते. त्यावेळी आरोपींनी त्याठिकाणी संरक्षण जाळी न लावता कामगारांना हेल्मेटसह इतरही सुरक्षिततेची साधने दिली नाहीत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, म्हस्के हे तिसऱ्या मजल्यावरील लाकडी पाडावरून तोल जाऊन खाली पडले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker dies after falling from building in Thergaon

Tags
टॉपिकस
Topic Tags: