
जागतिक जल दिनानिमित्त ‘जलयुक्त पिंपरी चिंचवड शहर’ कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पर्यावरण विभागातर्फे जागतिक जल दिनानिमित्त ‘जलयुक्त पिंपरी चिंचवड शहर’ कार्यक्रमाचे मंगळवार, दि. 22 मार्च 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. मोरया गोसावी मंदिर, चिंचवड येथे सकाळी ८ वाजता नदी स्वच्छता अभियान होणार आहे. यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सामाजिक संस्था यांचा सहभाग राहणार असून पवना नदीकाठ स्वच्छता व पवना आरती करण्यात येणार आहे.
तसेच, माहिती, जनजागृती व सांस्कृतिक करमणूक कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीमार्फत पाणी विषयावरील कामांची माहिती व उपक्रमांचे सादरीकरण (नदीसुधार, स्काडा, २४X७ पाणीपुरवठा, STP, स्मार्ट सिटी प्रकल्प) पाणी संवर्धनबाबत सामाजिक संस्थांचे योगदान यावर सादरीकरण, जल संवर्धन यावर योगदान देणाऱ्या सामजिक संस्था, संघटनांचा सन्मान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांचे मार्गदर्शन आणि आवाहन, पाणी प्रतिज्ञा यांचा कार्यक्रमात समावेश आहे.
“सरिता.. प्रवाहिता" हा पाणी विषयावर जनजागृतीपर नृत्य व संगीत युक्त सांस्कृतिक कार्यक्रम, कलाश्री नृत्यशाळा, कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आयोजित करण्यात आला आहे, तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
Web Title: World Water Day Pimpri Chinchwad Municipal Corporation Organizing Watery Pimpri Chinchwad City Program Environment Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..