पुलावरून फेकण्याची धमकी देत ऐवज लुटला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

प्रवासात मनीषकुमार यांच्याकडील हेडफोन, पावरबॅंक, दीड हजार रुपये रोख रक्कम, चांदीची साखळी, मोबाईल फोन असा 44 हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. 

पिंपरी- रिटर्न झालेली ऑर्डर परत घेऊन शेअर रिक्षातून जात असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून लुटले. आरडाओरडा केल्यास पुलावरून फेकून देण्याची धमकी दिली. ही घटना भूमकर चौक येथील सर्व्हिस रोडवर भरदुपारी घडली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

मनीषकुमार भोगी पासवान (वय 22, रा. मांजरी हडपसर पुणे. मूळ रा. बिहार) यांनी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषकुमार हे हिंजवडी येथील एक रिटर्न झालेली ऑर्डर परत घेऊन सोमवारी (ता.4) दुपारी दीडच्या सुमारास शिवाजी चौकातून बाणेर येथे शेअर रिक्षातून जात होते. शिवाजी चौक, हिंजवडी ते बाणेर या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत शेअरिंगमधील सहप्रवासी यांनी मनीषकुमार यांना त्यांच्या इच्छितस्थळी न सोडता अज्ञात ठिकाणी नेले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दरम्यान प्रवासात मनीषकुमार यांच्याकडील हेडफोन, पावरबॅंक, दीड हजार रुपये रोख रक्कम, चांदीची साखळी, मोबाईल फोन असा 44 हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. मनीषकुमार यांना मारहाण करून आरडाओरडा केल्यास ब्रिजवरून टाकून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man was robbed by three persons traveling in a shared rickshaw