तरुणाचं 35 लाखांसाठी केलं होतं अपहरण; पोलिसांनी ट्रॅप लावून केली सुटका

तरुणाचं 35 लाखांसाठी केलं होतं अपहरण; पोलिसांनी ट्रॅप लावून केली सुटका

पिंपरी : मुंबईतून पैसे घेण्यासाठी आकुर्डीत आलेल्या एका व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे तीन जणांनी अपरहरण केले. त्याला सोडविण्यासाठी 35 लाखांची खंडणी मागण्यात आली. ही घटना शनिवारी (ता. 9) आकुर्डी येथे घडली.

राहूल तिवारी (वय 27, सध्या रा. सिल्व्हर सेव्हन हॉटेल, आकुर्डी) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमर कदम, शशांक कदम आणि हरिश राजवाडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजकुमार मनोहरसिंग (वय 43, रा. लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स, कांदिवली, मुंबई) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी राजकुमार हे मॅनेजर राहूल तिवारी यांच्यासह आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये कामानिमित्त राहण्यासाठी आले होते. त्यांचा मॅनेजर राहूल तिवारी हा काळेवाडीतील नाना काळे यांच्याकडून गुंतवणूकीसाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी गेला होता. राजकुमार यांनी राहूल यांच्या मोबाइलवर फोन केला असता, तो राजकुमार याच्या ओळखीच्या आरोपी अमर कदम याने उचलला. राहूलला सोडायचे असेल, तर 35 लाख रुपये द्या, असे म्हणत खंडणीची मागणी केली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दोन तासांनी पुन्हा राहूल याच्या फोनवरून फिर्यादी राजकुमार यांना फोन आला. पैसे द्या नाहीतर राहूलला मारून टाकू, अशी धमकी दिली. रविवारी सकाळी दहा वाजता पुन्हा राहूल यांच्या फोनवरून फोन आला. त्यावेळी राहूल बोलला, की पैशाची व्यवस्था झाली आहे का? शशांक कदम, अमर कदम आणि हरिश राजवाडे ही लोकं मला मारून टाकतील. त्यानंतर अमर कदम आणि शशांक कदम हे बोलू लागले. तेव्हा फिर्यादी राजकुमार यांनी पैशाची व्यवस्था करीत असल्याचे आरोपींना सांगितले.
 खंडणीसाठी वारंवार फोन येऊ लागल्याने अखेर राजकुमार यांनी पोलिसांत धाव घेतली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी सापळा लावून आरोपींना मंगळवारी पहाटे डांगे चौक परिसतून ताब्यात घेतले. तसेच अपरहण झालेल्या राहुल तिवारी यांची सुखरूप सुटका केली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com