Thur, June 1, 2023

Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
Published on : 18 March 2023, 8:05 am
इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चिखलीतील, जाधववाडी येथे घडली आहे.
विरेन जाधव (वय २७, रा. रिव्हर रेसिडेन्सी चिखली, ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विरेन हा मागील काही दिवसांपासून मानसिक दृष्ट्या अस्थिर होता, असे पोलिसांनी सांगितले. यातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.