

Bollywood News: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरातच उपचार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या प्रकतीबाबत अफवा पसरवू नये आणि कुटुंबाच्या प्रायव्हसी अबाधित ठेवण्याचं आवाहन केलंय.