Hardik Pandya Dating Rumors: लोकप्रिय भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या याने महिन्याभरापूर्वी नताशा स्टेंकोव्हिकसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर नताशा आपल्या मुलाला घेऊन ती तिच्या माहेरी निघून गेली. त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा हा फार पूर्वीपासून होत्या. मात्र त्यांनी एक पोस्ट करत त्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर हार्दिक हा अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. अंबानींच्या लग्नात अनन्या आणि हार्दिक यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांचा संबंध जोडला होता. मात्र आता नेटकऱ्यांचा तो अंदाज चुकला असल्याचं दिसतंय. नुकतेच हार्दिकने काही फोटो शेअर केले आहेत. यावरून तो एक दुसऱ्याच अभिनेत्रीसोबत असल्याचं दिसतंय.
हार्दिकने १८ जुलै रोजी आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर हार्दिक अनन्या नाही तर अभिनेत्री जास्मिन वालिया हिला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्याचं कारण ठरलंय त्यांचे फोटो. हार्दिकने त्याच्या ग्रीसमधील व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तो एका पूलच्या बाजूला पोज देताना दिसतोय. मात्र त्याचं पूलसोबतचे फोटो अभिनेत्री जास्मिनने देखील शेअर केले आहेत. ती या फोटोंमध्ये निळ्या बिकिनीमध्ये दिसतेय. त्यांचे एकाच पूलवरचे फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. एकाच वेळेला ते दोघे एकाच ठिकाणी कसे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
जास्मिन वालिया एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही सेलिब्रिटी आहे. ती 'सोनू की टीटू की स्वीटी' या चित्रपटात दिसली होती. जास्मिन वालियाने म्युझिक इंडस्ट्रीत स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. मात्र, ती मूळची लंडनची आहे. तर तिचा जन्म एसेक्समध्ये झाला असून जस्मिनचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. जास्मिन ब्रिटिश रिॲलिटी टीव्ही शो 'द ओन्ली वे इज एसेक्स' मध्ये दिसली होती. तिने 2010 मध्ये तिच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.