
Kon Hotis Tu kay Jhalis Tu Serial Update: छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात स्टार प्रवाहच्या देखील काही मालिका आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'कोण होतीस तू, काय झालीस तू'. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवलीये. लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत आता नवीन ट्विस्ट आला आहे. आतापासून खऱ्या मालिकेला सुरुवात झालीये असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.