
छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यातील काही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या ठरतात तर काही मालिका लगेच प्रेक्षकांच्या विस्मरणात जातात. त्यात अशीच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे 'मुरांबा'. या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं. मालिकेची कथा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली. आता या मालिकेत नवीन ट्वीस्ट येणार आहे. मालिकेत आता आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.