राजू, घनश्याम आणि बाबूराव यांच्या तिघांना 'हेरा फेरी'मध्ये खूप पसंती मिळाली. आता 'हेरा फेरी'च्या चाहत्यांना याच्या तिसऱ्या भागाची खूप प्रतिक्षा आहे. माहितीनुसार बाबुराव म्हणजेच परेश रावल या तिसऱ्या भागात हिस्सा घेणार नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तसंच क्रिएटिव्ह मतभेदामुळे चित्रपट करत नसल्याचं त्यांनी सांगितलय.