

SANAI CHAUGHADE
ESAKAL
Sanai Choughade Serial: मालिकांमधील लग्नसोहळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरतात. आनंद, उत्साह, भावनिक क्षण आणि अनपेक्षित खुलासे यामुळे अशा प्रसंगांना वेगळीच रंगत येते. असाच सीन सध्या झी मराठीच्या 'सनई चौघडे' या मालिकेत सुरू आहे. मालिकेत सध्या लग्नाची धामधूम आहे. मात्र याच लग्नात अनेक खुलासे होणार आहेत आणि अनेकांची आयुष्य बदलणारा आहेत. जय आणि शर्वरी यांच्यासाठी तर हा एक मोठा क्षण आहे.