

SHAH RUKH KHAN
ESAKAL
बॉलिवूडचा किंग असणारा शाहरुख खान आजही लाखो लोकांचा आवडता आहे. त्याचे करोडो चाहते आहेत. तो आपल्या अभिनयाच्या जोरावर अख्ख्या बॉलीवूडचा बादशाह बनलाय. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिले. आज २ नोव्हेंबर रोजी शाहरुख ६० वर्षाचा झालाय. वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या शाहरुखचा उत्साह आजही वाखाणण्यासारखा आहे. तो आजवर अनेक ठिकाणी फिरलाय. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कुटुंबासोबत. मात्र असं एक ठिकाण आहे जिथे तो गेला नाहीये. ही अशी एक जागा आहे जिथे शाहरुख आजवर गेलेला नाही. ही जागा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणवला जाणारा काश्मीर. याचं कारण त्याने एका कार्यक्रमात सांगितलं होतं.