

'पुष्पा-2' या सुपरहिट चित्रपटाचा अभिनेता साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पुष्पा-२ च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. यात अल्लू अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्लूला आता दिलासा मिळाला असला तरी त्याच्यावर धोक्याची घंटा कायम आहे. त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असल्याने त्याला पुन्हा कधीही अटक होऊ शकते. तर दुसरीकडे या प्रकरणात अल्लूवर अशी कलमे लावण्यात आली आहेत. ज्यामुळे तो अडचणीत येऊ शकतो.