पुणे : प्लीज... मला या विषयावरची माहिती द्याल का...? थँक यु.. या आणि अशा शब्दांचा वापर तुम्ही चॅट जीपीटी वापरताना करता का..? कोणाशीही नम्रतेने बोलणे चांगलेच हे एकीकडे आपला संस्कार सांगतो तर दुसरीकडे नम्रतेने बोलण्याची तब्बल दहा कोटी रुपये किंमत चॅट जीपीटीला मोजावी लागते आहे..
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' वापरत असताना मात्र हा संस्कार पर्यावरणाची हानी करणारा ठरू शकतो. कारण चॅट जीपीटीची मातृसंस्था असणाऱ्या ओपन एआय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी अलीकडेच एक सोशल मिडियाच्या पोस्ट करत सांगितले की, या थँक यू आणि प्लीज यांसारख्या शब्दांमुळे त्यांच्या कंपनीला वीजखर्चापोटी तब्बल १० कोटी डॉलर्स इतकी जास्तीची किंमत मोजावी लागत आहे.
काय आहे हा सगळा प्रकार..? आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसे काम करते..? ChatGPT दररोज किती प्रश्नांची उत्तरे देते..? प्रत्येक प्रश्नासाठी किती वीज वापरते..? आणि यासाठी त्यांना वीजेपोटी वार्षिक खर्च किती येतो..? चॅट जीपीटीचे प्रीमियम युजर याचा कसा वापर करतात? आणि एकुणातच मशीन आणि मानवी संवाद कसा असावा याविषयी संशोधन काय सांगते जाणून घेऊया, 'सकाळ प्लस' च्या विशेष लेखातून..