esakal | बटाट्याचा दुष्काळ अन् जवळपास 15 लाख लोकांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Irish-potato-famine}

बटाट्याचा दुष्काळ अन् जवळपास 15 लाख लोकांचा मृत्यू

sakal_logo
By
अर्चना बनगे

युनायटेड किंग्डमचाच भाग असलेला आयर्लंड हा एक छोटासा देश. तसा शेतीच्या बाबतीत हा देश युरोपीय देशांपेक्षा तसा सधनच. या सधन देशात 18व्या शतकात खूप मोठा "बटाट्या'चा दुष्काळ पडला होता. आणि हा दुष्काळ एक - दोन नाही तर तब्बल सात वर्षे पडला होता. या दुष्काळाचा तेथील लोकांवर असा काही परिणाम झाला, की त्यात थोडेथोडके नव्हे तर तब्ब्ल 10 ते 15 लाख लोक मरण पावले. त्यानंतर हा देश या दुष्काळातून कसा सावरला? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया...

युनायटेड किंग्डममधील आयर्लंड हा एक छोटासा भाग होता. 1801 पासून हा भाग युनायटेड किंग्डमपासून विभागून स्वतंत्र देश म्हणून उदयाला आला. त्याकाळी संपूर्ण युरोपात बटाटा हे तेथील ग्रामीण लोकांचे मुख्य अन्न होते. साहजिकच आयर्लंडमधील ग्रामीण भाग पण बटाटा या पिकावरच अवलंबून होता. देशातील सुमारे एक तृतियांश भाग या पिकावर अवलंबून होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र 1845 ते 1852 या कालावधीत असं काही घडलं, की या भागात दुष्काळ पडला आणि त्याचा मोठा फटका तेथील नागरिकांना बसला.

कसा पडला बटाट्यावर रोग?

1885 मध्ये बटाट्याच्या पिकावर 'फ्लाइट' या बुरशीजन्य संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. कापणीला आलेले सुमारे तीन चतुर्थांश पीक हे या बुरशीजन्य संसर्गाने नष्ट झाले. याचा परिणाम प्रत्यक्षरीत्या कोट्यवधी निराधार शेतकऱ्यांवर झाला. नागरिक सोडा, शेतकऱ्याला स्वतःला सुद्धा खायला काही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. लोकांना खायला अन्नच उपलब्ध नसल्याने अनेक सार्वजनिक कामे त्या काळात बंद पडली. सततची उपासमार, आजारपण आणि दारिद्य्र यांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेला अपंग केले. एक- दोन वर्ष नाही तर तब्ब्ल सहा- सात वर्षं ही परिस्थिती अस्तित्वात होती. या उपासमारीला कंटाळून दहा लाख लोकांनी आपला देश सोडला. त्यांनी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशात आश्रय घेतला. तर जवळपास 10 ते 15 लाख लोक या दुष्काळात मृत्युमुखी पडले. एकूणच आयर्लंडमधील लोकसंख्या या सर्व भीषण परिस्थितीमुळे जवळजवळ एक चतुर्थांशने निम्मी झाली.

ग्रेट आयरिश हंगरचे वैज्ञानिक कारण

या मोठ्या दुष्काळाचे कारण दडलंय वनस्पतिजन्य अशा हवेत पसरलेल्या एका विषारी बुरशी (फ्थोथथोरा इन्फेस्टन्स) मध्ये. 1845 च्या सप्टेंबर महिन्यात हा रोग बटाट्याच्या पानांवर दिसला. या रोगामुळे बटाट्याची झाडे जलदगतीने सुकू लागली. शेतकरी बटाटा काढण्यासाठी जेव्हा शेतात गेले, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात सडलेले बटाटे आढळले. यातील गरीब शेतकऱ्यांनी चांगले बटाटे शोधून काढले. मात्र ते सहा महिन्यांतच खराब झाले. 1845 पासून जशा पद्धतीचा हा दुष्काळ होता तसाच तो 1847 च्या शेवटापर्यंत होता.

द ग्रेट ब्रिटनचा प्रतिसाद

सन 1800 पासून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत स्वातंत्र्ययुद्ध होईपर्यंत ग्रेट ब्रिटनने वसाहतींवर प्रभावीपणे राज्य केले. एकत्रितपणे युनायटेड किंग्डमला ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड म्हणून ओळखले जाते. या काळात ब्रिटिश सरकारने आयर्लंडचे कार्यकारी राज्य प्रमुख म्हणून नियुक्त केले, ज्यांना अनुक्रमे लॉर्ड, लेफ्टनंट आणि आयर्लंडचे मुख्य सचिव म्हणून ओळखले जात होते. एकूणच हाउस ऑफ कॉमन्स या संस्थेच्या खालच्या सभागृहात 105 प्रतिनिधी आणि अठ्ठावीस समन्वयक सभागृहात पाठवले जात. या निवडलेल्या प्रतिनिधींपैकी बरेच लोक हे ब्रिटिश वंशाचे किंवा त्यांचे पुत्र आणि मालक होते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आयर्लंडमधील बहुतांश लोकसंख्या असलेल्या, धर्माचा अभ्यास करणाऱ्या आयरिश लोकांना सुरुवातीला जमीन ताब्यात घेण्यास किंवा भाड्याने देण्यास तथाकथित दंडात्मतक कायद्याच्या अंतर्गत मनाई करण्यात आली होती. या वेळी दंड विषयक कायदे मोठ्या प्रमाणात 1829 मध्ये रद्द करण्यात आले. तरीही या कायद्यांचा प्रभाव आयर्लंडच्या कारभारावर झाला आणि बटाटा दुष्काळ अधिक प्रभावी झाला.

असा झाला विनाश

इंग्रज आणि आयरिश कुटुंबांकडे देशातील बहुतेक जमिनी होत्या. गरीब भाडेकरू शेतकऱ्यांना जमीन मालकांकडे अगदी कमी पैशात काम करावे लागे. दुष्काळाच्या प्रारंभाच्या शंभर वर्षांपूर्वी आयर्लंडमध्ये बटाट्याच्या लैंडिंड ह्युटोरियान या एकाच जातीची लागवड करण्यात आली होती. विशेषतः थंडीच्या काळात ते गरीब लोकांचे अन्न बनले होते. आलेल्या रोगामुळे जवळपास 75 टक्के बटाटा नष्ट झाल्यामुळे अन्नधान्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्या वेळी नेत्यांनी राणी व्हिक्‍टोरिया आणि संसदेस विनंती करून तथाकथित "कॉर्न लॉ' आणि त्याच्यावरील कर रद्द करण्यास भाग पाडले. त्यामुळे धान्य आणि ब्रेडसारखे अन्नपदार्थ जे महाग होते ते थोड्या प्रमाणात स्वस्त झाले. परंतु यानंतरही अनेक शेतकरी त्यांच्या स्वतःसाठी लागेल एवढी सुद्धा पुरेशा अन्नाची सोय करू शकले नाहीत. दुसऱ्या बाजूस तर अन्नधान्याच्या किमती वाढत चालल्या. त्यामुळे हजारो लोक उपासमारीने मरण पावले तर अनेकांना कुपोषणामुळे गंभीर आजार होऊ लागले.

एका प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात 1847 मध्ये आयर्लंडमधील मटार, सोयाबीन, मासे तसेच मध हे मोठ्या प्रमाणात निर्यात होत राहिले. त्यामुळेच ग्रामीण भागाला अन्नधान्य कमी पडले. परिणामी दुष्काळाच्या वेळी जवळजवळ एक दशलक्ष आयरिश पुरुष- स्त्रिया आणि मुले मरण पावली आणि एक दशलक्ष नागरिक गरिबी व उपासमारीपासून मुक्त होण्यासाठी उत्तर अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनमधील विविध शहरांमध्ये स्थलांतरित झाले.

ब्रिटिश सरकारची भूमिका

बटाटा दुष्काळावेळी ब्रिटिश सरकारची नेमकी कोणती भूमिका होती, त्याबाबतही एक संशय निर्माण झाला होता. त्या वेळेच्या निष्क्रियतेसाठी ब्रिटिश सरकारला जबाबदार धरायचे का? याची चर्चा अजूनही केली जाते.

आयरिश हंगर मेमोरियल्स

आयरिश लोकांनी ज्या शहरांमध्ये अखेरचे वास्तव्य केले आणि त्यानंतरच्या दशकात घडलेल्या घटनेनंतर प्राण गमावलेल्या अनेक नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध उत्सव साजरे केले जातात. आजही बोस्टन, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि फिनिक्‍स तसेच कॅनडामधील मॉन्ट्रियल आणि टोरांटो ऑस्ट्रेलिया आणि ग्रेट ब्रिटनमधील अनेक शहरांत हा उत्सव साजरा केला जातो. याव्यतिरिक्त ग्लासगो सेलटिक, एफसी, स्कॉटलंडमधील आयरिश स्थलांतरितांनी स्थापन केलेल्या संघटना हा उत्सव साजरा करतात.