esakal | आयुष्यभर मगरीसोबत खेळला; जीव मात्र एका माशाने घेतला
sakal

बोलून बातमी शोधा

Irwin conservationist}

आयुष्यभर मगरीसोबत खेळला; जीव मात्र एका माशाने घेतला

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

क्रोकोडाईल हंटर स्टीव्ह इर्विनला अजूनही जग विसरलं नाही. त्याचा जन्म 22 फेब्रुवारी 1962 रोजी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे झाला. मोठा टीव्ही कलाकार, वन्यजीव प्रेमी म्हणून त्याची ओळख आहे. लहानपणापासूनच त्याला मगरींसह खेळायला आवडत होते. हा छंद देखील त्याची ओळख बनली आणि तो जगात क्रोकोडाईल हंटर म्हणून प्रसिद्ध झाला. मगरींबरोबरच सापही त्याचा आवडता प्राणी होता. जिथे लोक साप व मगरींना पाहून पळून जात असत, तिथे इर्विन त्यांच्या अगदी जवळ जायचा. मात्र ज्याने त्याला नाव आणि प्रसिद्धी दिली त्या प्राण्यांचे जग त्याच्या मृत्यूचे कारण बनले. जाणून घ्या स्टीव्ह इर्विनच्या जीवनाविषयी, जगप्रसिद्ध वन्यजीवप्रेमीच्या दु:खद अंताविषयी...

इर्विनने केला टीकेचा सामना

एकदा तो हातात मुलीसह मगर घेऊन खेळताना दिसला, तेव्हा अनेक संस्थांकडून त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. असे सांगण्यात आले की, या स्टंटमुळे मुलीच्या जीवाला धोका होऊ शकतो. काही संस्थांनी त्याच्यावर मुलांच्या हिताचे उल्लंघन केल्याचा आरोप देखील केला. त्यानंतर इर्विन आणि त्याच्या पत्नीला माफी मागावी लागली. इर्विनच्या पत्नीने आपल्या निवेदनात असे म्हटले होते, की जेव्हा ती आपल्या मुलीला हातात धरून मगरीसोबत होती, तेव्हा ती खूप सावध आणि मगरीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती.

2004 मध्ये इर्विनच्या एका कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. जेव्हा तो मगरीला खायला घालत होता, तेव्हा तो आपल्या हातात एका मुलाला धरला होता. शोमध्ये अशी काही छायाचित्रे होती ज्यात इर्विनचा मुलगा रॉबर्टकडे मगर दिसली. अशा कृत्याद्वारे इर्विनने मुलाचे जीवन धोक्‍यात आणले असल्याचा आरोप लोकांनी केला होता. तथापि, इर्विनने दावा केला, की त्याचा मुलगा कोणत्याही धोक्‍यात नाही. तो म्हणाला, की तो स्वतःच प्राणी संग्रहालयात प्राण्यांबरोबर वाढला होता. म्हणूनच त्याचा मुलगा आणि मुलीनेही असा अनुभव घ्यावा.

धोकादायक प्राणी खेळणींसारखे होते

इर्विनला हे धोकादायक प्राणी खेळणींसारखे होते, ज्यांचा जगाला भीती वाटत होती. त्याचे वडील बॉब इर्विन देखील एक वन्यजीव तज्ज्ञ होते तर त्याची आई लिन इर्विन यांनी वन्यजीव पुनर्वसनासाठी काम केले. त्याच्या कुटुंबाचे वन्यजीवांशी खूप जवळचे नाते होते. इर्विन आपल्या पालकांसह 1970 मध्ये ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड राज्यात गेला. तिथे त्याच्या आई-वडिलांनी "बिरवाह रेप्टाइल अँड फाउना पार्क' नावाने प्राणी संग्रहालय सुरू केले. नंतर त्याचे नाव बदलून "क्वीन्सलॅंड रेप्टाइल अँड फाउना पार्क' ठेवले गेले. मगर आणि साप येथे राहायचे. त्याच्या घरात एक लहान प्राणी संग्रहालयही होते. तेथेच त्याचे बालपण धोकादायक प्राण्यांबरोबर मौजमजा करण्यात गेले. इर्विनने वडिलांकडून मगरी आणि साप पकडणे शिकले.

Irwin conservationist

Irwin conservationist

जेव्हा वडिलांनी अजगर भेट दिली...

मगरी आणि साप यांच्या प्रेमामुळे त्याच्या वडिलांनी वाढदिवशी इर्विनला अजगर भेट म्हणून दिली. हे कदाचित विचित्र वाटेल, परंतु हे खरे आहे. प्राण्यांव्यतिरिक्त इर्विन आपल्या पत्नीवरदेखील खूप प्रेम करत होता. दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. त्यांची लव्ह स्टोरी 1991 मध्ये सुरू झाली होती जेव्हा अमेरिकन टेरी रेन्स ऑस्ट्रेलिया भेटीसाठी आली होती. सुरवातीच्या भेटीनंतर हे संबंध कधी प्रेमात रूपांतर झाले हे त्या दोघांनाही कळले नाही. 1992 मध्ये या दोघांचे लग्न झाले. या दोघांमधील खास बाब म्हणजे, हे दोघेही वन्यजीवप्रेमी होते. त्यांच्या लग्नाचीही एक रंजक कहाणी आहे. दोघांनी लग्नाची अंगठी घालण्यास नकार दिला होता. त्यांचा असा विश्वास होता, की अंगठी घालणे त्यांच्यासाठी काम केलेल्या प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

हॉलिवूडचा रस्ता...

टीव्हीचे एक प्रख्यात व्यक्तिमत्त्व असल्यामुळे इर्विनची देशात आणि जगात वेगळी ओळख होती. "ऍनिमल प्लॅनेट'च्या शोमधूनही त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यावर प्रसारित झालेले दोनशेहून अधिक कार्यक्रम त्याने केले. यात तो साप आणि मगर यांच्याशी खेळताना आणि त्यांच्याबरोबर आयुष्य जगताना दिसला. त्याला त्यांच्याबद्दल प्रत्येक तपशील माहीत होता. या कार्यक्रमात या धोकादायक प्राण्यांपासून संरक्षण कसे करावे, हे देखील सांगत असत. 2001 मध्ये, इर्विन हॉलिवूडमध्ये देखील गेला आणि "डॉ. डॉलिटल' या विनोदी चित्रपटात अभिनयही केला. यामध्ये एडी मर्फीही त्याच्यासोबत होते. इतकेच नाही, तर इर्विनने स्वत: "क्रोकोडाईल हंटर : कॉलिजन कोर्स' या बायोपिकमध्येही काम केले. यामध्ये त्याची पत्नी देखील त्याच्यात सहभागी होती.

"ऍनिमल प्लॅनेट'ने दिली लोकप्रियता

ऑस्ट्रेलियन टीव्ही शो "क्रोकोडाईल हंटर'वर चार वर्षे काम केल्यानंतर, इर्विनला अमेरिकेतील केबल नेटवर्क ऍनिमल प्लॅनेटने घेतले. जेव्हा हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर होता, तेव्हा 200 पेक्षा जास्त देशांमध्ये तो प्रसारित झाला. त्यानंतर स्टीव्ह इर्विन लोकप्रिय झाला. मालिकेतील इर्विनची जनावरांशी होणारी धोकादायक घटना पाहून प्रेक्षक दंग झाले. प्राणघातक साप, सरडे, मगरी यांच्यात अडकण्यास त्याला भीती वाटत नव्हती. उलटपक्षी प्रेक्षकांनी वन्यजीवनाविषयी शिकवण्याचे कृत्य मानले. प्रेक्षकांना असे वाटले, की प्राण्यांबद्दलचे त्याचे ज्ञान सामायिक करून आणि प्राण्यांबद्दल आपुलकी दाखवून तो आपल्या प्रेक्षकांना काहीतरी शिकवत आहे. खाकी शर्ट आणि चड्डी इर्विनचे वैशिष्ट्य ठरले होते.

मगर-ड्रॅगनबरोबर खेळायला जायचा परंतु पोपटाला घाबरायचा

स्टीव्ह इर्विन याला मगरी आणि साप यांसारख्या प्राण्यांची आवड होती. मगरांवर जास्त जीव असल्यामुळे त्याला क्रोकोडाईल हंटर असेही म्हणतात. स्टीव्ह इर्विन मगर आणि साप घेऊन मोठा झाला. मग विश्वास करणे कठीण वाटते की "क्रोकोडाईल हंटर' पोपटांना घाबरतो! एकदा त्याने मुलाखतीदरम्यान सांगितले, की त्याला फक्त एका प्राण्याची भीती आहे आणि तो म्हणजे पोपट. त्याने सांगितले, की काही कारणास्तव पोपटाने त्याला चावले. पोपटाने इतक्‍या वाईट रीतीने चावले, की त्याचे नाक जवळजवळ पूर्णपणे कापले गेले. त्याने सांगितले, की बऱ्याच वेळा पोपट त्याला वाईट चावतो.

क्रोकोडाईल हंटरचा दुःखद अंत

जगातील क्रोकोडाईल हंटर (मगरींचा शिकारी) स्टीव्ह इर्विन म्हणून ओळखला जाणारा स्टीफन रॉबर्ट इर्विन याचे 4 सप्टेंबर 2016 रोजी निधन झाले. इर्विनच्या अकाली मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला. मृत्यूच्या वेळी तो ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅंडमध्ये आपल्या मुलीच्या प्रोजेक्‍टसाठी पाण्याखाली चित्रपट बनवण्यात गुंतला होता. त्याच वेळी तो स्टिंग्रे माशाजवळ (Stingray Fish) डुबकी मारत होता. त्याला माशाने शेपटीने डंख मारला. हा डंख इतका जोरदार होता की काही क्षणातच इर्विनने देहभान गमावलं. डंख झाल्यानंतर लगेच त्याच्या हृदयाचे कार्य थांबले आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या माशांमुळे माणसाच्या मृत्यूच्या घटना तशा कमीच घडल्या; मात्र इर्विन याला अपवाद असला तरी, वास्तविक या माशाच्या शेपटीत काटे असल्याने इर्विनला आपला जीव गमवावा लागला. 4 सप्टेंबर 2016 चा तो दिवस वन्यजीवप्रेमींसाठी धक्कादायक ठरला. त्याच्या मृत्यूवर जगाने शोक व्यक्त केला. त्याच्या सन्मानार्थ प्राण्यांच्या अनेक प्रजातींना त्याचे नाव देण्यात आले. त्याच्या स्मरणार्थ 15 नोव्हेंबर रोजी "स्टीव्ह इर्विन डे' जाहीर करण्यात आला.

कॅमेरामन होता मृत्यूचा साक्षीदार

ज्याने त्याला नाव आणि प्रसिद्धी दिली त्या प्राण्यांचे जग त्याच्या मृत्यूचे कारण बनले. त्याच्या मृत्यूचे सत्य पहिल्यांदा सर्वांसमोर आले आणि हे सांगायला कोणीही नाही; परंतु त्याचा कॅमेरामन सावलीप्रमाणे त्याच्यासोबत राहतो. त्याच्या मृत्यूच्या घटनेदिवशीही तो इर्विनसोबत होता. कॅमेरामन जस्टिन लिओन्स म्हणतो, की तो क्षण खूपच भयानक होता. आम्ही अंतिम शॉट घेत होतो. त्याला स्टिंग्रेच्या मागून पोहायचे होते.

पण अचानक सर्व काही चुकले आणि स्टिंग्रेने हल्ला केला. एका क्षणात त्याने शंभरपेक्षा जास्त वेळा हल्ला केला. हे हल्ले त्याच्या धोकादायक शेपटीचे होते. मला काहीच समजत नव्हतं. रक्ताने पाणी लाल झाल्याचे पाहिल्यावर धोक्‍याची जाणीव झाली. इर्विननेही आपल्या छातीत अडकलेला काटा काढण्याचा प्रयत्न केला होता. तो एक फूट लांब होता परंतु स्टीव्ह तो बाहेर काढू शकला नाही. जेव्हा त्याला पाण्यातून बाहेर काढले गेले तेव्हा त्याला खूप वेदना होत होत्या. त्याच्या छातीत दोन इंचाची जखम होती, ज्यातून रक्तस्राव होत होता. काटेरी विष होते, त्यामुळे वेदना व्हायच्या. शेवटच्या क्षणापर्यंत तो आयुष्यासाठी लढा देत होता. बायकोचा आणि दोन मुलांचा विचार करत त्याचा श्वास कोंडत होता. तो फक्त शेवटच्या क्षणी म्हणाला, "मी मरत आहे.' मला चमत्कार अपेक्षित होता; परंतु डॉक्‍टरांनी त्याला पाहिल्यानंतर 10 सेकंदातच मृत घोषित केले.