Positivity- How to keep yourself happy at workplace by setting aside negative thoughts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकारात्मकता}

Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

प्रा. सौ. सुषमा जयंत भोसले

आपल्या सुखासमाधानाचा डोलारा आपले आरोग्य संपदा Health आणि स्वाभिमान या तीन खांबांवर उभा असतो. स्वतःला कमी लेखणं व स्वतःवरचा विश्वास नाहीसा होणं याचा अतिरेक झाला, की आपण जगण्यास नालायक आहोत, असं तीव्रतेनं वाटायला लागतं..का होतं असं? How to keep yourself happy at workplace by setting aside negative thoughts

एका प्रतिथयश कंपनीत काम करणाऱ्या उच्चशिक्षित संगणक अभियंत्यानं आत्महत्या Suicide केली..अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांतून वाचायला मिळता. खरंतर आपण स्वतःच्या हातानं आपल्या आयुष्याची दोरी तोडणं ही घटना विशेष करुण Sad व भीषण आहे.

त्यामुळे शेकडो विचारांचं Thoughts वादळ मनात घोंघावत राहतं. अरे असं का केलंस तू? काय हवं होतं तुला? आमचं काही चुकलं का? त्याला आम्ही वाचवू शकलो असतो का? वाटतं की त्याला परत बोलवावं आणि गदागदा हलवून विचारावं का? का? का? पण आता तो कधीच परत येणार नसतो.

आपल्या प्रत्येकाला जीवन Life प्रिय असलं तरी रागाच्या भरात निराशेच्या प्रसंगी, दुःखाच्या वेळी मृत्यूचे विचार आपल्याही मनात कधी ना कधी डोकावून जातात. हे विचार झुरळ झटकावं तसे क्षणभरात आपण झटकूनही टाकतो. मात्र काही जण या विचारांशी खेळून बघतात, तर काही या विचारांच्या आहारी जाऊन आत्मघात करून घेतात.

सभोवतालच्या समाजाला, मित्र परिवार व कुटुंबीयांना Family वाटत नसलं तरी स्वतःला असफल, अयशस्वी, अकार्यक्षम मानणारा माणूस नैराश्य Depression व वैफल्याचा राग स्वतःवर काढतो. आत्महत्या हे एक प्रकारे स्वतः विरुद्धचं आक्रमण असतं. डॉ. अॅडलर यांच्या मते आत्महत्या ही न्यूनगंडातून होणारी घटना असते. आत्महत्या करणं म्हणजे स्वतःला निर्दोष ठरविणं ही त्या व्यक्तीच्या अंतर्मनातील प्रतिक्रिया असते. आपलं आपल्याशी असलेलं नातं, स्वप्रतिमा व सभोवतालच्या जगाशी जुळलेले बंध यापैकी काहीही विचलित झालं, की माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो.

आपल्या सुखासमाधानाचा डोलारा आपले आरोग्य संपदा Health आणि स्वाभिमान या तीन खांबांवर उभा असतो. स्वतःला कमी लेखणं व स्वतःवरचा विश्वास नाहीसा होणं याचा अतिरेक झाला, की आपण जगण्यास नालायक आहोत, असं तीव्रतेनं वाटायला लागतं. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काही अडचणींमुळे, तात्पुरत्या कारणांमुळे आपण निराश होतो. या नैराश्यामुळे हे तीनही खांब डगमगू लागतात व कुठलंही काम आपल्या हातून सुरळीतपणे पार पडणार नाही, अशी भीती वाटते.

हे देखिल वाचा-

लोक काय म्हणतील? कसं होणार? माझं चुकूच कसं शकतं? माझ्याच्यानं हे काम होत नाही म्हणजे काय? असे नकारात्मक विचार प्रभावी होत जातात. सध्याच्या काळात सततची तीव्र स्पर्धा, असुरक्षिततेची भावना, मागे पडण्याची भीती, प्रतिष्ठेच्या अत्यंत चुकीच्या कल्पना (मोठे घर, लक्झुरियस कार, ब्रँडेड कपडे, हॉटेलिंग) यामुळे आपल्या प्रतिष्ठेचं नुकसान, वैयक्तिक मानहानी व आपल्याला शरमिंदा करणारी छोटीशी गोष्टसुद्धा खूप जिव्हारी लागते.

बहुतेक वेळा आपण आपले स्वतःबद्दलचे केलेले मूल्यमापन Evaluation म्हणजेच आपली स्वप्रतिमा ही आपल्या अबोध मनात दडलेली असते. आपणच आपली स्वप्रतिमा ठरवली तर आत्मविश्वास गमावून बसतो. साहजिकच आपल्या प्रत्येक कृतीला इतरांचा पाठिंबा Support, शाबासकी लागते. इतर दुखावले जातील या भीतीनं स्वतःचा स्वाभाविक रागही व्यक्त करता येत नाही. हा राग अंतर्मनामध्ये खोलवर रुजतो, त्याचं रूपांतर आत्मघातामध्ये होतं.

कामाच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची आपली प्रतिमा निर्माण झाली, की अपेक्षांचं ओझं वाढून जातं. त्याबरोबरीनं बऱ्याचदा मागे पडण्याची भीती व त्यातून येणारी असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. त्यामुळे कार्यक्षमता कमी झाली किंवा कामात अडचणी आल्या तर थोडं थांबून स्वतःला तपासून ( अर्थात शारीरिक व मानसिकदृष्ट्या) पाहणं गरजेचं ठरतं.

पण आपल्या आयुष्यातला सध्याचा कालखंड अडचणीचा खडतर असला तरी तो कायम तसाच राहील असा गैरसमज करून घेतला जातो आणि दुसरे म्हणजे माझ्या आयुष्यात अडचण उभी कशी राहू शकते, म्हणजे माझ्यातील कुवत / क्षमता संपली, माझे सर्व आयुष्य खराब झाले असे मानण्यामुळे आत्मघात केला जातो.

आत्महत्येचा प्रयत्न करायचा ठरवणारा माणूस त्याच्या परीनं इशारा देत असतो. इशारा देणाऱ्या माणसाला आशा हवी असते, मदत हवी असते. आपण अगदीच कुचकामी, टाकाऊ झालेलो नाही, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, आपली तेवढी लायकी आहे. हे त्याला ऐकायचं असतं. आत्मघातकी माणूस बहुतेक वेळा मनातील नकारात्मक भावना संभाषणात व्यक्त करीत असतो.

ऐकणाऱ्याला त्या रुचत वा पटत नाहीत किंवा त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. त्यामुळे, 'यात काळजी करण्यासारखं काय आहे? घाबरायला काय झालं? एवढा बाऊ करण्यासारखं काय आहे? किंवा छे! तुझ्याकडून आम्ही असं अपेक्षित करतच नाही' अशी वाक्ये येतात.

त्यामुळे एकटेपणा, हतबलपणा जास्त वाढतो. आपल्याला कोणी समजू शकत नाही, ही असहायतेची भावना प्रबळ होऊन जगण्याऐवजी तो मरण्याला प्रवृत्त होतो.

हे देखिल वाचा-

कामाच्या ठिकाणी चांगले वर्क कल्चर, आवश्यक सुविधा, अनौपचारिक व मैत्रीपूर्ण वातावरण असले तरी एखाद्या सक्षम कर्मचाऱ्याकडून आत्मघातासारखे धक्कादायक वर्तन घडते तेव्हा कुटुंबाबरोबरच त्या संस्थेचीसुद्धा हानी होते.

त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखण्याबरोबरच स्वाभिमानाचे रूपांतर दुराभिमान किंवा न्यूनगंडामध्ये न होऊ देणे हितावह ठरते. आपली प्रतिमा निरोगी नसेल तर आपण कितीही सुखात लोळत असलो तरी असमाधानी व अतृप्त राहतो. सतत काळजी व अनाठायी भय आपली पाठ सोडत नाही. पण हे वास्तव स्वीकारायला आपणही तयार नसतो व असह्य झाले की टोकाचे भीषण पाऊल उचलले जाते.

टॅग्स :positive thoughtsThoughts