Bangladesh liberation Day 2021: भारत - सोव्हिएत करार आवश्यक होता का?

भारत -सोव्हिएत करार
भारत -सोव्हिएत करार
Summary

50 Years Of Bangladesh Liberation :भारत-पाक युद्धावेळी(Indo-Pak War) विजयी भारतीय लष्कराला लाहोरकडे कूच करण्यापासून सोव्हिएत (Soviet) महासंघाने रोखले होते. काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून भारताने प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित राखायला हवे होते.

पाकिस्तानपासून १९७१मध्ये ज्या दिवशी मुक्ती मिळाली, त्या १६ डिसेंबर या विजय दिनाचा (Bangladesh liberation day)सुवर्ण महोत्सव बांगलादेश साजरा करत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने (India)दक्षिण आशियातल्या या नव्या देशाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली. उपखंडातली ही दुसरी फाळणी होती. १९४७ला झालेल्या पहिल्या फाळणीत अखंड भारताचे तुकडे होऊन पाकिस्तान (Pakistan) या स्वतंत्र देशाचा जन्म झाला होता. २५ वर्षांच्या आतच पाकिस्तानला तेच भोग भोगावे लागले. या सर्व घटनांची सविस्तर नोंद घेतली गेलेली आहे. (Why Was the Indo-Soviet pact necessary 50 Years Of Bangladesh Liberation)

मात्र, त्या काळाशी निगडित एका प्रश्नावर मात्र अभावानेच चर्चा झाली आहे. ‘‘बांगलादेशला मुक्त करण्यासाठी भारत-सोव्हिएत करार करणे भारताला खरेच आवश्यक होते का?’’ नंतरच्या घटनांचा आढावा घेतल्यास, या करारापासून मिळालेल्या फायद्यांपेक्षा त्याचे दुष्परिणामच अधिक झाल्याचे दिसून आले आहे. चीनला रोखण्यासाठी अमेरिकेबरोबर (आणि जपान आणि ऑस्ट्रेलिया या इतर दोन सदस्यांसह तथाकथित ‘क्वाड’बरोबर) संरक्षण आघाडी करण्याच्या सध्या मोदी सरकारच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न अधिक संयुक्तिक वाटतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com