Hinduism - कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापुंचे हिंदुत्व विरुद्ध संघाचे हिदुत्व}
हिंदुत्वाबाबत बापुंची काय होती व्याख्या

कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

तुषार गांधी
हिंदूइझमचे ‘हिंदुत्व’ एका राजकीय, भ्रष्ट आवृत्तीने अपहरण केले आहे. सनातन धर्म हा विहिरीतील बेडकाप्रमाणे मर्यादित नाही. अशी सनातन धर्माची व्याख्या बापुंनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही काळ अगोदर केली होती..काय होती बापूंची हिदुत्वाची व्याख्या?

मोहनदास गांधी, ‘बापू’ नेहमीच आपण हिंदू असल्याचा दावा करत असत. केवळ हिंदू नव्हे तर सनातनी हिंदू असल्याचे ते आग्रहाने सांगायचे. सांप्रत काळात त्यांचे हे वाक्य आपल्याला भयंकर वाटेल. सध्याच्या वातावरणात ‘सनातन’ या शब्दामुळे एक भितीदायक चित्र उभे राहते. हिंदूइझमचे ‘हिंदुत्व’ या एका राजकीय, भ्रष्ट आवृत्तीने अपहरण केले आहे. सनातन धर्म हा विहिरीतील बेडकाप्रमाणे मर्यादित नाही. अशी सनातन धर्माची व्याख्या बापुंनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही काळ अगोदर केली होती. (Hinduism in terms of Mahatma Gandhi And Rashtriya Swayansevak Sangh)

तो समुद्रासारखा व्यापक आहे. ही सर्व मानवी समुदायाची अमानत आहे. भलेही तिला कुठल्याही नावाने संबोधित करा. असे १० ऑगस्ट १९४७ च्या ‘हरिजन’च्या अंकात बापुंनी (Mahatma Gandhi) लिहिले होते. देशाच जन्म आणि त्याची फाळणी होण्याच्या हिंसक काळात त्यांनी हे लिहिले. जेव्हा देशभरात धर्मांध रक्तपाताने तांडव माजला होता. ज्यामुळे नव्याने जन्माला येणाऱ्या देशाला गिळून टाकण्याचा धोका उत्पन्न झाला होता.

पुढे ते ‘फेलोशिप ऑफ फेथ’मध्ये पान क्रमांक ५२ वर लिहितात, ‘‘माझा धर्म हिंदू आहे, जो मानवतेचा धर्म आहे आणि जगातील सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. माझा धर्म सत्य आणि अहिंसा म्हणजेच व्यापक अर्थाने प्रेमाविषयी बोलतो. मी माझ्या धर्माचे वर्णन अनेकदा सत्याचा धर्म असे करतो.’’ आजचे हिंदुत्व या सौम्य, दयाळू आणि सर्वसमावेशक धर्माचे रुपांतर अहंकारी आणि धर्मांध राक्षसात करू पाहत आहे.

भारताला गिळू पाहणाऱ्या द्वेष आणि हिंसाचाराचा निषेध करताना बापुंनी हिंदूंना (Hindu) सांगितले की, हिंदू धर्म हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. छळवणुकीमुळे परागंदा झालेल्या ख्रिश्चनांना, बेनी इस्त्रायल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्यूंना आणि पारशी (Parsi) समुदायांनाही त्याने आश्रय दिला. सर्वसमावेशक आणि सहिष्णू हिंदूइझमचा मी भाग असल्याचा मला अभिमान आहे. हे विधान त्यांनी ३० नोव्हेंबर १९४७ ला ‘हरिजन’ मध्ये केले होते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तेव्हा बापू ‘हिंदू’ हा शब्द भारतात राहणारे सर्व या अर्थानेच वापरत असत. जरी ते वेगळ्या धर्मश्रद्धेचा उल्लेख करत असले तरी.

हिंदू धर्म हा सत्य (Truth) आणि अंहिसेच्या भक्कम पायावर उभा आहे. त्यामुळे त्याचा इतर धर्मांशी संघर्ष होण्याचा संबंधच नाही, असे गांधी २५ मार्च १९३९ च्या ‘हरिजन’मध्ये लिहितात. आज हिंदुत्ववादी मतदार इतर धर्म आणि धर्मियांशी सतत वाद करत आहे. हिंदूवाद हा असा महासागर आहे जो सर्व प्रकारच्या सत्यांना स्वीकारतो आणि आत्मसात करतो. भारतीय आणि हिंदू आपला वारसा विसरले आहेत ही शोकांतिका आहे, असे ते १४ डिसेंबर १९४७ च्या ‘हरिजन’मध्ये लिहितात.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

बापुंनी हे शब्द स्वातंत्र्यानंतर लगेच लिहिले असले तरी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते अधिक संयुक्तिक आहेत. कारण, यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा होत आहे. ज्या प्रकारचे आक्रमक आणि अहंकारी हिंदुत्व आज आचरणात आणले जात आहे, त्यामुळे देश आणि धर्म याआधी कधीच नव्हता इतका कमकुवत झाला आहे.

मोहनदास एका सनातनी उच्चजातीय हिंदू कुटुंबात वाढले होते. जिथे अस्पृश्यतेसह सर्व प्रकारच्या हिंदू परंपरा, प्रथांचे पालन केले जात असे. मोहनला अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना दिली जाणारी अमानवीय वागणूक दिसली. तो मोठा झाल्यावर या प्रथेबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला आणि तरुणपणी त्याने या प्रथा मोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. परंतु या प्रथेवर टीका करताना त्यांनी कधीही हिंदू धर्माचा धिक्कार केला नाही किंवा त्याग केला नाही.

दक्षिण आफ्रिकेत त्यांचा संबंध ख्रिश्चन पाद्र्यांशी जवळून आला. तिथे त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी मोठा आग्रह करण्यात आला. पण, तरीही हिंदू प्रथांमध्ये अनेक दोष आहेत हे कबूल करूनही, त्याचा धिक्कार करण्याचे किंवा दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्याचे आपल्याला कोणतेही कारण दिसत नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. सर्व धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासामुळे त्यांची धार्मिकतेची समज वाढली. आणि हिंदू धर्माचे सार समजून घेण्याबाबत ते अधिक ठाम झाले.

हिंदूइझम हा उगमस्थानी शुद्ध आणि पवित्र आहे. पण, वाहत असताना मार्गात तो अनेक प्रकारची अशुद्धता आपल्यासोबत वाहून नेतो. सर्वसाधारणपणे तो गंगेसारखाच फायदेशीर आहे. प्रत्येक प्रांतात तो प्रांतीय रुप धारण करतो. पण, त्याचे अंतस्थ ‘सार’ कायम राहते. हे त्यांनी ८ एप्रिल १९२६ मध्ये ‘यंग इंडिया’मधील लेखात लिहिले आहे. हिंदुत्व हे अंतस्थ ‘सार’ भ्रष्ट करत आहे. त्यानंतर ८ मार्च १९४२ ला ‘हरिजन’मध्ये ते म्हणतात, माझ्या कल्पनेतील हिंदू धर्म हा संकुचित पंथ नाही. ही एक प्रचंड मोठी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. यात झोआराष्टर, मोझेस, ख्रिस्त, मोहम्मद, नानक आणि इतर प्रेषितांच्या शिकवणुकीचे सार आहे.

आज हिंदूंनी हा खरा हिंदू धर्म शिकण्याची, समजून घेण्याची आणि आचरणात आणण्याची गरज आहे. ज्यावर बापूंनी विश्वास ठेवला, आचरणात आणला आणि ज्याचा अभिमान बाळगला. ज्याला ते सनातन हिंदू धर्म म्हणत असत. तो राजकीय फायद्यासाठी असहिष्णू, दुष्ट आणि हिंसक हिंदुत्वात भ्रष्ट झालेला नव्हता. बापुंच्या वेळी हिंदू धर्माचे दोन साधक होते. एक होते मोहनदास गांधी, ज्यांनी सत्य, प्रेम आणि करुणेच्या सनातन हिंदू धर्माचे पालन केले. तर दुसरा होता नथुराम गोडसे, ज्याने स्वतःला सनातनी हिंदू म्हणवले. पण, ज्याने क्रूर, खुनशी, रानटी, खुनी भ्रष्ट पद्धतीचे आचरण केले. ज्याला आज हिंदुत्व म्हटले जात आहे. या दोन्हीमध्ये प्रचंड फरक आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये.