
निकिता कातकाडे
प्रवास माणसाला समृद्ध करत असतो. नवीन ठिकाणाला भेट देणे जितके रोमांचक असते, तितकेच त्या ठिकाणाच्या आठवणी फोटोंच्या माध्यमातून आपल्या कॅमेरात जतन करण्याची क्रेझ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच असते.
आजच्या काळात आपल्या हातात फोनच्या रूपात कॅमेरा कायमच असतो. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी, कधीही, कोणालाही फोटो क्लिक करणे सहज शक्य होते. परंतु चांगले फोटो क्लिक करणे हे एक कौशल्य आहे.