esakal | मार्केटमध्ये अवघ्या पाच हजार रुपयांपासून सुरुवात; आज काही हजार कोटींचे
sakal

बोलून बातमी शोधा

 Rakesh Jhunjhunwala}

मार्केटमध्ये अवघ्या पाच हजार रुपयांपासून सुरुवात; आज काही हजार कोटींचे

sakal_logo
By
सुमित बागुल

आपल्या सर्वांनाच श्रीमंत व्हायचं असतं. त्यासाठी आपण पदरमोड करत पै आणि पै साठवून आपल्या भविष्यासाठी जमा करून ठेवतो. आपण फार फार तर पैसेFD मध्ये ठेवतो किंवा म्युच्युअल फंडात किंवा अगदी काही जण पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. सध्याच्या स्थितीचा विचार केला तर तर दिवसेंदिवस महागाई वाढतेय. अशात वाढणारी महागाई आणि बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवलेल्या पैशांमधून आपल्याला जो परतावा मिळतो तो अगदीच कमी असतो. म्हणूनच आता आपण इतर गुंतवणुकीच्या विकल्पांकडे वळायला लागलो आहोत. यापैकी चांगला परतावा देणारा विकल्प म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये असे अनेक जण आहेत ज्यांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. या बड्या लोकांनी सुरवात अगदी कमी पैशांमधून करत स्वतःच मोठं साम्राज्य उभं केलंय. यातीलच एक मोठं नाव म्हणजे राकेश झुनझुनवाला. राकेश झुंजूनवाला यांनी अवघ्या पाच हजार रुपयांपासून सुरुवात केली आणि सध्या काही हजार कोटींचे झुनझुनवाला हे मालक आहेत. या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात राकेश झुनझुनवाला यांच्याबद्दलच्या काही रंजक आणि प्रेरणादायी गोष्टी.

"माझ्याकडे पैसे मागायला यायचं नाही"

सुरुवात करूयात राकेश झुनझुनवाला यांच्या जन्मापासून. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म त्या शहरातून झाला जे शहर कधीही झोपत नाही असं म्हणतात. होय ! ५ जुलै १९६० रोजी मुबंईत राकेश झुनझुनवाला यांचा जन्म झाला. राकेश झुनझुनवाला यांचे वडील हे आयकर विभागात अधिकारी म्हणून काम करत असत. अगदी लहानपणापासूनच झुनझुनवाला यांना शेअर मार्केटची माहिती मिळायला लागली आणि त्यांनी त्यामध्ये लक्ष देखील द्यायला सुरवात केली. लहानपणी जेंव्हा त्यांचे वडील आणि वडिईलांचे मित्र जेंव्हा शेअर बाजाराबद्दल बोलत असत तेंव्हा राकेश झुनझुनवाला हे आपल्या वडिलांना शेअर बाजाराबाबत अनेक प्रश्न विचारात असत. राकेश झुनझुनवाला यांनी मुंबईच्या सिडनहॅम (Sydenham College) मधून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९८५ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी चार्टर्ड अकाउंटिंग म्हणजेच CA चं शिक्षण घेतलं आणि त्यानांतर शेअर बाजारात करिअर करण्याचा निर्णय घेतला. याबाबत राकेश यांनी आपल्या वडिलांना देखील सांगितलं. तेंव्हा वडिलांनी त्यांना एक सल्ला दिला, वडिलांनी राकेश यांना त्यांना जे आवडतं ते करू दिलं. मात्र वडिलांनी त्यांना सांगितलं की माझ्याकडे किंवा माझ्या मित्रांकडे पैसे मागायला यायचं नाही. सोबतच ते हेही म्हणालेत की, "अजिबात घाबरू नकोस, बी फिरलेस". तेंव्हा राकेश झुनझुनवाला यांच्याकडे अवघे पाच हजार रुपये होते.

पहिला प्रॉफिट कसा कमावला ?

जेंव्हा राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात जाण्याचा निर्णय घेतला तेंव्हा तेंच्याकडे केवळ पाच हजार रुपयेच भांडवल म्हणून होते. दरम्यानच्या काळात राकेश झुनझुनवाला यांचे भाऊ देखील CA करत होते. त्यांच्या भावाच्या ओळखीत अशा एक व्यक्ती होत्या ज्यांच्याकडे काही रक्कम होती आणि ज्यांना त्यातून चांगला परतावा मिळवायचा होता. त्या काळात फिक्स्ड डिपॉझिटवर साधारण १० टक्के परतावा मिळत असे. मात्र राकेश यांनी १८ टक्के परतावा मिळवून देण्याची कबुली दिली आणि त्या महिलेकडून अडीच लाखांचं भांडवल मिळवलं. यासोबतच राकेश यांनी आणखी एका व्यक्तीकडून ५ लाख रुपये घेतले आणि सुरवातीचं भांडवल उभं केलं. आपल्या करिअरच्या सुरवातीला राकेश झुनझुनवाला यांनी ट्रेडिंग करून तब्बल ८ ते १० लाख रुपये कमावले.

कठीण दिवस आणि गगनभरारी

यानंतर पुढील काही वर्ष राकेश झुनझुनवाला यांच्यासाठी कठीण गेलेत. १९८८ मध्ये त्यांनी सिसा गोवा या कंपनीचे अडीच लाख शेअर २८ रुपयांना आणि अडीच लाख शेअर्स ३५ रुपयांना विकार घेतले होते. अवघ्या सहा महिन्यात या शेअर्सची किंमत तब्बल ६५ रुपयांवर गेली. १९८९ मध्ये व्ही पी सिंह यांचं सरकार होतं. त्यावेळी मधू धनवटी हे देशाचे अर्थमंत्री होते. १९८९ चं मधू धनवटी यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प राकेश झुनझुनवाला यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट राहिला.

त्यावेळी सर्वांना असं वाटत होतं की मधू धांवती अर्थसंकल्पात ज्या घोषणा करणार आहेत त्या सामाजिक स्तरावरील असतील आणि ज्यामध्ये उद्योग धंद्यांशी निगडित फार काही नसेल. मात्र व्ही पी सिंह हे तत्कालीन पंतप्रधान होते. ते ठाकूर होते आणि उद्योगांच्या बाबतीतील त्यांची जाण उत्तम होते. त्यामुळे व्ही पी सिंह यांच्या कार्यकाळात केवळ सामाजिक स्तरावर लक्ष केन्दत्रित करणारा अर्थसंकल्प येऊच शकत नाही असं राकेश झुनझुनवाला याना वाटत होतं. अकहर बजेटच्या दिवशी राकेश झुनझुनवाला यांना जसं वाटत होत अगदी तसंच झालं. ताटकालीन अर्थमंत्र्यांनी सादर केलेलं बजेट हे उद्योग धान्यासाठी सकारात्मक होतं. बजेट आधी राकेश झुनझुनवाला यांची शेअर बाजारातील एकूण मूल्य हे २ कोटींचं होतं. मात्र बजेटच्या ५ महिन्यानंतर त्यांच्या गुंतवणुकांचं एकूण मूल्य तब्बल ५० ते ६० कोटींवर गेलं.

स्वतःच्या फर्मची स्थापना

यानंतर राकेश यांनी रेअर एंटरप्राइज या फर्मची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून राकेश झुनझुनवाला हे स्वतःचा पोर्टफोलिओ सांभाळत असत. RARE मधील पहिली दोन अक्षरं ही त्यांच्या स्वतःच्या नावातील होती तर दुसरी दोन अक्षरं ही त्यांच्या पत्नीच्या नावातील म्हणजे रेखा यांच्या नावातील होती.

टायटन कंपनीच्या शेअर्सची खरेदी

राकेश झुनझुनवाला यांनी २००२ आणि २००३ मध्ये टायटन कंपनीच्या शेअर्सची एवढ्या ४ रुपये ५० पैसे प्रति शेअर अशी खरेदी केली. त्यानंतर टायटन चा शेअर तब्बल ८० रुपयांपर्यंत वधारला आणि त्यानांतर ३० रुपयांपर्यंत कोसळला. ज्यावेळी टायटनचा शेअर ३० रुपयांपर्यंत कोसळला तेंन्व्हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओची रक्कम तब्बल ३०० कोटींपर्यंत कोसळली होती. मात्र राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधील एकही शेअर विकला नाही. आज याच टायटनच्या एका शेअरची किंमत तब्बल सतराशे रुपये आहे.

चुकांमधून शिकण्याची वृत्ती

राकेश झुनझुनवाला यांनी २७ कोटी रुपयांचे शेअर्स विकून मुंबईतील मलबार हिल भागामध्ये स्वतःसाठी एक घर खरेदी केलं. ते घर त्यांनी नंतर विकलं देखील. त्या घराच्या भांड्यातून त्यांनी तब्बल ८० ते ९० कोटी कमावले देखील. मात्र त्यांचं म्हणणं होतं की जर तेच पैसे त्यांनी शेअर बाजारात ठेवले असते तर त्याचे साधारण ७०० ते ८०० कोटी तरी झाले असते. मात्र राकेश झुनझुनवाला यांच्यातील चुकांमधून शिकण्याच्या वृत्तीचा देखील फायदा झाला. त्यांचं एकचं म्हणणं असायचं की इन्व्हेस्टिंग मधील एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे अनुभव आणि मानून आपल्या अनुभवातूनच शिकतो. राकेश झुनझुनवाला यांच्या म्हणण्यानुसार शेअर बाजार कधी योग्य किंवा अयोग्य नसतो. त्यामध्ये गुंतवणूक करणारी आपण चुकीचे किंवा बरोबर असतो. त्यामुळे आपल्या चुकांमधून शिकून आपण पुढे जायला हवं असं झुनझुनवाला यांचं म्हणणं आहे.

भारताच्या भरभराटी वर झुनझुनवाला यांना भरवसा

शेअर मार्केटमधील आलेल्या लहानश्या मंदीला फाटा देत भारताचे बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी भारतीय शेअर बाजाराबाबत एक अत्यंत मोठं विधान केलं आहे. राकेश झुनझुनवाला यांच्यामते भारतातील महागाईची चिंता तात्पुरती असून भारतीय शेअर मार्केटमध्ये येत्या काळात चांगली तेजी पाहायला मिळेल. लहान गुंतवणूकदारांनी सध्याची मंदी आणि लहान करेक्शन यांना घाबरू नये, हे कमी काळापुरते असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मला 2002-2003 च्या काळातील तेजी आठवते

सध्याच्या स्थितीची तुलना राकेश झुनझुनवाला यांनी 2004 ते 2008 च्या बुल मार्केटसोबत केली आहे. मला 2002-2003 च्या काळातील तेजी आठवते आणि सध्याची तेजी तशीच भासत असल्याचं झुनझुनवाला म्हणालेत. भारतीय शेअर बाजाराची ही तेजी केवळ सहा वर्ष नाही तर पूर्ण दशक कायम राहणार असल्याचा अंदाज झुनझुनवाला यांनी वर्तविला आहे.

कोरोनाची तिसरी लाट येईल असं वाटत नाही

यावेळी बोलताना राकेश झुनझुनवाला यांनी कोरोनावर देखील भाष्य केलं आहे. मला कोरोनाची तिसरी लाट येईल असं वाटत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल कुणीही भविष्यवाणी केली नव्हती आणि आता सर्वजण कोरोनाच्या तिसऱ्या लातेबद्दल बोलत आहेत असं ते म्हणालेत. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु आहे, अशात लसीकरण आणि लोकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असं राकेश झुनझुनवाला यांना वाटत आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था उत्तमरित्या तयार असल्याचंही झुनझुनवाला म्हणतात.

अर्थव्यवस्थेबाबत राकेश झुनझुनवाला अत्यंत सकारात्मक

लहान आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्समधील वाढीबाबत देखील झुनझुनवाला यांनी भाष्य केलं आहे. लहान आणि मध्यम भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समधील किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशात बुल रन हा कधीही एकाच दिशेने जात नाही, जराशी मंदी किंवा लहानसं करेक्शन येणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत राकेश झुनझुनवाला अत्यंत सकारात्मक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. सरकारने उचललेल्या पावलाचा परिणाम येत्या काळात दिसून येईल असंही त्यांचं मानणं आहे.

अर्थव्यवस्था आता गगनभरारी घेण्याच्या स्थितीत

राकेश झुनझुनवाला म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था आता गगनभरारी घेण्याच्या स्थितीत आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेला भरारी घेण्याआधी NPA सायकलमधून जावंच लागतं. याशिवाय भरतोय अर्थव्यवस्थेला जन धन, आयबीसी, रेरा, खाण सुधारणा, कामगार आणि कृषी कायदा यासारख्या रिफॉर्मचा सामना करावा लागलाय. अशात भारत आता उत्तम आणि लांब पल्ल्याच्या आर्थिक विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या बदलांमुळे आता त्यांचा परिणाम येत्या काळात पाहायला मिळेल.