
Flat खरेदी करण्यापूर्वी कार्पेट एरिया आणि बिल्ट अप एरिया हे आधी समजून घ्या !
Carpet area Vs Built up area: आज कुठल्याही व्यक्तीला जेव्हा तयार फ्लॅट घ्यावयाची वेळ येते, तेव्हा पहिला प्रश्न पडतो तो फ्लॅटच्या क्षेत्रफळाबद्दल. त्याबाबत बिल्डर Bulder जो बिल्टअप एरिया सांगतील तेच त्या फ्लॅटचे क्षेत्रफळ समजले जाते आणि त्या वास्तूची, सदनिकेची Flat किंमत त्यावर ठरवली जाते. Know about Built up and Carpet Area Before Buying Flat
बिल्टअप एरिआ Built Up Area म्हटले की सर्वसाधारण बाहेरील सर्व बाजूंचे मोजमाप केले असता जे क्षेत्रफळ येते, त्यास बिल्टअप संबोधले जाते आणि कारपेट Carpet Area म्हटले की प्रत्येक खोलीच्या चार भिंतींच्या आतील क्षेत्रफळ म्हणजे कारपेट एरिया अर्थात चटई क्षेत्र असा सर्वसाधारण अर्थ लावता येईल.
कारपेट म्हणजे चटई आणि चटई ज्या ज्या ठिकाणी अंथरता येईल त्या त्या क्षेत्रफळास चटई क्षेत्र म्हटले जाते. चटई क्षेत्र हे नकाशांवर प्रत्येक खोलीच्या दिलेल्या मोजमापाप्रमाणे क्षेत्रफळ काढून फ्लॅटच्या आतील सर्व पॅसेजेसचे मोजमापदेखील काढून सर्व एकत्र केले असता येईल ते चटई क्षेत्र.
मग त्याप्रमाणे बिल्डर्स जो बिल्टअप सांगतात, ते अचूक असतो का? तो जे सांगतात तो कारपेट क्षेत्रफळावर काही बिल्डर्स वीस टक्के अधिक धरतात, तर काही बिल्डर्स पंचवीस टक्के अधिक लावतात.
यातील खरे नक्की कोणते? म्हणजे समजा पाचशे चौरस फूट चटई क्षेत्र असल्यास काही बिल्डर्स किंवा बिल्डर्स असोसिएन्स वीस टक्के म्हणजे सहाशे चौरस फूट सांगतील, तेच काही जण कारपेट अधिक पंचवीस टक्के सांगतील, म्हणजे सहाशे पंचवीस होईल.
त्यामुळे काही ठिकाणी काही अंशी चौरस फुटाचा दर कमी असूनही क्षेत्रफळ ग्राहकाच्या हातात कमीच येते.
हे देखिल वाचा-
परंतु तुम्हाला जो फ्लॅट विकत घ्यावयाचा त्या फ्लॅटचा जिना व पॅसेज सोडून बिल्टअप (बांधकाम क्षेत्र) खरा व अचूक काढता येऊ शकतो. मात्र ही माहिती कुठलाही ग्राहक फ्लॅट घेण्यापूर्वी एखाद्या जाणकाराला किंवा आर्किटेक्टला कधीही विचारत नाही.
नंतर चांगली रक्कम जाऊनदेखील जेव्हा क्षेत्रफळ कमी वाटायला लागते, त्या वेळेस मात्र सगळ्यांकडे चौकशीस सुरवात होते.
मात्र त्या वेळेस तुम्ही बिल्डरच्या करारनाम्यावर सही करून ते कबूल केलेले असते. नंतर बिल्डरने आम्हाला फसवले असे म्हणण्याची वेळ येते.
खरे तर तुम्हीच स्वतः त्यास जबाबदार असता. म्हणून फ्लॅट खरेदी करताना सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो प्रत्यक्षात फ्लॅट किती चौरस फूट आहे, याची जाणकाराकडून माहिती करून घेणे.
बिल्डरच्या करारनाम्यातील क्षेत्र आणि याचा ताळमेळ झाल्यावर समोर स्पष्ट विचारून दराप्रमाणे क्षेत्र नक्की करावे अथवा दर कमी करावा. अशा वेळेस फ्लॅटचे जे अचूक क्षेत्रफळ असेल, त्या क्षेत्रफळावरच दर काढून किंमत नक्की करावी.
पार्किंगच्या जागेचा प्रश्न:
फ्लॅट खरेदी करताना दुसरा मुद्दा येतो तो पार्किंगचे क्षेत्रफळ व त्यावरचा दर हा कसा असावा किंवा तो बिल्डरला देणे योग्य आहे का ?
खरे पाहिले तर कुठल्याही बिल्डरला पार्किंग करून देणे ही महापालिकेने नियमानुसार दिलेली अटच असते, किंबहुना नकाशामध्ये किती फ्लॅट बांधणार, त्यास किती पार्किंग लागणार, याचा तपशील दिल्यावरच नकाशे मंजूर होतात.
शिवाय या क्षेत्राची मंजुरी त्यांना बांधकाम क्षेत्रफळाखेरीज दिलेली असते. तेव्हा फ्लॅट घेताना प्रत्येकाचे पार्किंग किंवा हक्काचे पार्किंग पाहण्यास हरकत नाही. त्याचा हट्ट किंवा करारनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेखही पाहून घेणे जरुरीचे आहे.
हे देखिल वाचा-
पार्किंगकरता वेगळी किंमत मोजायची का? किंवा ती किती? व त्यातली नेमकी वाजवी कोणती?
बिल्डर ज्या वेळेस प्रकल्पाचा खर्च काढतात, त्या वेळेस सर्व सुविधा आणि बांधकाम या सर्वाचा खर्च भागिले विक्री करण्यात येणारे क्षेत्र याचा ताळमेळ घालूनच दर काढलेला असतो. म्हणूनच तो बांधकामाचा दर अधिक जागेचा दर याच्या कितीतरी पट अधिक येतो.
कारण जर तुम्ही पार्किंगची किंमत मोजणार असाल तर मलनिस्सारण वाहिनी (ड्रेनेज लाइन)ची, पाण्याची टाकी (वॉटर टँक) किंवा अंतर्गत रस्त्याचीही किंमत मोजावी लागेल.
त्यापेक्षा सर्वांत जास्त दर जर कबूल केला तर तो पार्किंगसह असावा, असा आग्रह धरावा किंवा फ्लॅटचा अगदी वाजवी दर म्हणजेच सरकारी किमतीप्रमाणे जागेची किंमत आणि चालू बांधकामाच्या दर्जानुसार बांधकामाचा दरही योग्य असल्यास पार्किंगला एकूण क्षेत्रफळाच्या निम्मे क्षेत्र गृहीत धरून त्यावर बिल्टअप रेट देण्यास हरकत नाही.