Sachin Tendulkar House : मास्टर ब्लास्टर सचिनचं कोट्यावधींचं घर आतून दिसतं कसं? बघा फोटोज l sachin tendulkar 50th birthday see his luxury house bunglow inside photos worth rupees 78 crores | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar House

Sachin Tendulkar House : मास्टर ब्लास्टर सचिनचं कोट्यावधींचं घर आतून दिसतं कसं? बघा फोटोज

Sachin Tendulkar House Interior Photos : क्रिडा क्षेत्रातील जगप्रसिद्ध व्यक्तीमत्वातील एक व्यक्तीमत्व म्हणजे सचिन तेंडुलकर. आज सचिन तेंडुलकरचा पन्नासावा वाढदिवस. कोट्यावधींचा मालक सचिन तेंडुलकर किती आलिशान घरात राहातो माहितीये? त्याच्या घराचे आकर्षक फोटो बघून तुम्हीही त्याच्या घराच्या प्रेमात पडाल. त्याचं संपूर्ण घर आतून कसं दिसतं ते फोटोंच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Sachin Tendulkar House

Sachin Tendulkar House

२४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचे जगभरात चाहते आहेत. त्याच्या क्रिडा क्षेत्रातील करिष्मा आजही लोकांच्या आठवणीत आहे. क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर सचिन मुंबईतील वांद्रेमधील त्याच्या आलिशान घरात कुटुंबासह क्वॉलिटी टाइम घालवतोय.

Sachin Tendulkar House

Sachin Tendulkar House

सचिन त्याच्या आलिशान घरात त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांच्यासह राहातो. त्याचे हे आलिशान घर तीन मजल्यांचे आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घराची अंदाजे किंमत 78 कोटी असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई उपनगरातील वांद्रे येथील पेरी क्रॉस रोड येथील सचिनचे घर 6000 sqft एरियामध्ये पसरलेले आहे.

Sachin Tendulkar House

Sachin Tendulkar House

सचिन तेंडुलकरचं आलिशान घर हे १० प्रशस्त खोल्यांचे आणि आत्याधुनिक सुविधांनी युक्त असे आहे. खालच्या तळघरात किमान 50 वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे, तर वरच्या तळघरात स्वयंपाकघर, नोकरांची निवासस्थाने आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने एक प्रमुख निगराणी क्षेत्र आहे.

Sachin Tendulkar House

Sachin Tendulkar House

काळ्या संगमरवरी फ्लोअरिंगसह भौमितिक कोरीवकाम असलेल्या भव्य लाकडी दुहेरी दरवाजांनी आणि कुंडीत लावलेल्या हिरव्यागार झाडांनी ही ईमारत सजली आहे. सुंदर आर्ट आणि चोहीकडून सुंदर आर्क्टिटेक्चरने हे घर समृद्ध आहे. (Bunglow)

Sachin Tendulkar House

Sachin Tendulkar House

भारतीय आणि पाश्चात्य डिझाइनतचे मिश्रण, आधुनिक फर्निचर तुम्हाला त्याच्या घरी दिसून येईल. आतील भागात हिरव्या, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या छटांमध्ये सुशोभितपणे तपशीलवार कलाकृतींचा समावेश आहे. तसेच अनेक वर्षांमध्ये सचिनला मिळालेल्या अनेक फ्रेम आणि पुरस्कार तुम्हाला त्याच्या घरी सजवलेले दिसून येतील. याशिवाय आधुनिक लाकडी दिव्यांची कोरीव छत आणि टर्किश कार्पेट्ससह चकचकीत संगमरवरी मजले सचिनच्या घराचे स्वरूप पूर्ण करतात.