Home Decor- Vastu घराच्या ‘या’ कोपऱ्यात बसवा पिवळी फरशी, सगळ्या चिंता होतील दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घराच्या या कोपऱ्यात बसवा पिवळी फरशी

Vastu घराच्या ‘या’ कोपऱ्यात बसवा पिवळी फरशी, सगळ्या चिंता होतील दूर

वास्तू शास्त्रामध्ये घराच्या Home निर्मितीपासून ते डिझाइन, रंग सर्व गोष्टी विस्तारात सांगण्यात आल्या आहेत. घराती निर्मिती करताना अनेकजण केवळ दिशांचा Directions विचार करतात. मात्र त्या घरातील इतर गोष्टींच्या बाबतीत गांभिर्याने विचार करत नाहीत. vastu tips home yellow marble floor southwest vastu house

मात्र जर तुम्हाला घरात सुख, शांती आणि समृद्दी हवी असेल तर वास्तू शास्त्राच्या इतर बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. वास्तू शास्त्राप्रमाणे Vastu Shastra घराच्या एखाद्या खोलीला किंवा ठराविक कोपऱ्यात कोणत्या रंगाची फरशी Tiles वापरावी हे देखील सांगण्यात आलं आहे. 

जर तुम्ही घरात योग्य ठिकाणी योग्य रंगाचा मार्बल बसवलात तर तुमच्या घरात सुख-शांतीसोबतच धनलाभ होण्यासही मदत होईल. वास्तू शास्त्रानुसार घराचा नैऋत्य कोन म्हणजेच दक्षिण-पश्चिम दिशेच्या फ्लोरसाठी कोणता रंग वापरावा आणि त्याचे फायदे काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

घराच्या किंवा ऑफिस दुकानाच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये पिवळ्या रंगाच्या फरशीचा वापर करावा. पिवळ्या रंगाची फरशी बसवणं शुभ मानलं जातं. जर तुम्हाला या संपूर्ण भागात पिवळ्या रंगाची फरशी बसवाची नसेल तर तुम्ही या दिशेच्या हा भागात पिवळ्या रंगाचा मार्बल बसवू शकता. पिवळ्या रंगाच्या फरशीमुळे या दिशेतील शुभ फळांची पूर्तता होवू शकते. 

वास्तू शास्त्रानुसार या नैऋत्य कोनामध्ये पिवळ्या रंगाची फरशी बसवल्यास घर किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता निर्माण होत नाही. सर्व गोष्टींमध्ये स्थैर्य लाभतं. तसचं घरातील मातेची प्रकृती चांगली राहते. Yellow floor benefits 

घराच्या किंवा ऑफिस दुकानाच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये पिवळ्या रंगाची फरशी बसवल्यास पैशांची कमतरता होत नाही. त्यामुळे तुम्हाला धनलाभ होतो. 

हे देखिल वाचा-

या गोष्टी ध्यानात घ्या

जर तुमच्या घराच्या भिंतीचा रंग गडद असेल तर फरशी कधीही गडद रंगाची बसवू नये. अशावेळी फरशी सफेद किंवा ऑफ व्हाईट बसवावी. यामुळे घरात कोणतही नुकसान होत नाही. घरात फरशीवर जास्त रंगीबीरंगी, चट्टेपट्टेरी किंवा डार्क रंगाचं कार्पेट टाकू नये. यामुळे घरात नकारात्मकता पसरू शकते. यामुळे घरातील सुख-शांतीमध्ये बाधा निर्माण होवू शकते. Vastu tips for floor

या गोष्टींची घ्या काळजी

  • कधीही सिंथेटीक मार्बलचा वापर करू नये. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या मार्बलचा वापर करावा.

  • घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचं मार्बल किंवा डिझाइन बनवल्यास कुटुंबाच्या मान-सन्मानात वाढ होते.

  • नवं घर बनवत असताना कधीही जुने दगड, विटा, माती, फरश्या किंवा लोखंडाचा वापर करू नये.

  • नवं घर बांधताना सर्व नवं बांधकाम साहित्य वापरावं

    यासाठीच घरात फरशी बसवताना विचारपूर्वक तिची निवड करा. कारण घराच्या भिंतींचा रंग बदलणं सहज शक्य असतं. मात्र फरशी बदलणं खूपच किटकट आणि खर्चिक ठरू शकतं. यासाठी वास्तू तज्ञांच्या मदतीने घराच्या विविध खोल्यांसाठी फरश्यांच्या रंगांची निवड करा.