
बंदबाबत नागरीकांना कल्पना असल्यामुले बसला जास्त प्रवासी संख्या नव्हती. बिबवेवाडी परीसरातील अप्पर व मार्केटयार्ड बस डेपोच्या आवारात बस लावायला जागा शिल्लक नव्हती.
बिबवेवाडी (पुणे) : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला शहरातील सर्व समाजातील नागरीकांनी पाठींबा देत शंभर टक्के बंद पाळला. उपनगरांमध्ये सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. पीएमपीएलच्या बस सकाली 9 वाजेपर्यंत सुरु होत्या. परंतू वातावरणाचा अंदाज घेऊन बस जवळ असेल त्या बस डेपोमध्ये लावण्यात आल्या.
बंदबाबत नागरीकांना कल्पना असल्यामुले बसला जास्त प्रवासी संख्या नव्हती. बिबवेवाडी परीसरातील अप्पर व मार्केटयार्ड बस डेपोच्या आवारात बस लावायला जागा शिल्लक नव्हती. सकाळपासूनच परीसरातील तरुणांनी दुचाकीवरुन रॅली काढत मार्केट यार्डतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला पुष्पहार घालून वंदन करीत रॅलीला सुरवात करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होत होते.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.