पुणे : क्रांतीदिनी पुकारेलल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी आ्रकमक झालेल्या आंदोलकांना संयोजकांकडून शांततेचे आवाहन केले असून मोर्चा संपल्याचे जाहीर केले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ सुरु झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतो. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

मराठा आरक्षणांच्या मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या समन्वयकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारले. मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाची राष्ट्रगीताने सांगता करुन मोर्चा संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रविण गायकवाड यांनी मराठा बांधवांना ''आंदोलन संपले आहे. परतीचा मार्ग स्विकारावा'' असे निवेदन केले. परंतु मराठा आंदोलकांनी परिसरात प्रचंड घोषणाबाजी केली.
- कॅम्प परिसरात रोझरी शाळेजवळ एका उबेर कारची तोडफोड. पोलिसांनी जखमी चालकाला ससूनमध्ये दाखल केले.
- कॅम्पमध्ये रोझरी शाळेजवळ एका उबेर कारवर दगडफेक. जखमी चालकाला पोलिसांनी ससूनला हलवले.
- सोमवार पेठेत सीताराम थोपटे मंडईमध्ये हुल्लडबाजांनी भाजीचे स्टॉल उधळूनलावले
- सोमवार पेठेत सारस्वत बँकचे शटर बंद करण्यास भाग पाडले, शटरवर दगडफेक
- चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक