#MarathaKrantiMorcha पुण्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 July 2018

पुणे : मराठा समाजाकडून आरक्षणासाठी कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी, पिसोळी, कोंढवा खुर्द परिसरातील नागरिकांनी खडीमशीन चौकात आंदोलन केले. या आंदोलनात भगवे झेंडे घेऊन हाजारो तरूण व महिला सहभागी झाले होते.  'कोण म्हणतय देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या. परिसरातील दुकाने महाविदयालय बंद ठेवण्यात आली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
 
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता जीव गमवाव्या लागलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे यांना श्रद्धांजली वाहीली. माजी आमदार महादेव बाबर म्हणाले, ९० ते ९५ टक्के मराठा समाज आर्थिक शैक्षणिक व सामाजिकदुष्टया मागास आहे. प्रशासनामध्ये मराठा समाज खूप कमी आहे. त्यामूऴे समाजास आरक्षण मिळणे गरजेचे आहे.

जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले, ''मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन या परिसरात करण्यात येईल.'' जिल्हा परिषद माजी सदस्य दशरथ काळभोर म्हणाले, ''पन्नास वर्षापूर्वी मराठा समाजातील कुंटूंबांना शेती भऱपूर होती. भावंडांची संख्या कमी होती. कालांतराने कुटूंबात भावडांची संख्या वाढत गेली. त्यामुळे हेक्टरच्या जमीन एकरामध्ये आल्या त्यानंतर त्यागूंठयात येऊन स्केवअर फुटात आल्या आहेत.

त्यामुळे मराठा समाज आर्थिक दुष्टया मागास असल्याने आरक्षण मिळणे गरजेचे आहे. यामध्ये राकेश कामठे, गणेश कामठे, सदिप बधे, विलास कामठे, स्वप्नील शेलार, अनिता कामठे, मनिषा कामठे, संगिता ठोसर, चंद्रकांत गायकवाड, शाम मरळ, दिपक कामठे, अनिल कामठे, दादा धांडेकर, अरूण कामठे, रुपाली गायकवाड, अमोल धर्मावत, कैलास ठोसर, आदी मान्यवर सहभागी होते. महिलांकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याचे निवेदन कोंढवा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha Movement for the Maratha Reservation in pune