वारी छायाचित्र स्पर्धेत मुकुंद पारखे प्रथम

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

पुणे - भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफीच्या वतीने आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत पुणे येथील मुकुंद पारखे यांनी पाठविलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. श्रीधर पलंगे (पुणे) यांनी सात हजार रुपयांचे द्वितीय, तर नंदुरबार जिल्ह्यातील नितीन पाटील यांनी पाच हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सुमीत चव्हाण, मंगेश मोरे (पुणे) आणि आनंद बोरा (नाशिक) या तिघांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

स्पर्धेतील पोज्ड पोर्ट्रेट या स्वतंत्र विभागात ओंकार दामले (पुणे) यांनी प्रथम, योगेश पोळ (चिंचवड) यांनी द्वितीय आणि मुकुंद पारखे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्रथम क्रमांकास प्रोफोटो ए-वन लेझर लाइट, द्वितीय क्रमांकास प्रोफेशनल कॅमेरा ट्रायपॉड व तृतीय क्रमांकास प्रोफेशनल कॅमेरा बॅग देण्यात येणार आहे. या विभागातील पारितोषिके चेन्नई येथील श्रीष्टी डिजिलाइफ प्रायव्हेट कंपनीमार्फत देण्यात येत आहेत.

राज्याच्या विविध भागातील सुमारे शंभराहून अधिक हौशी, अनुभवी आणि नवोदित छायाचित्रकारांनी दीड हजाराहून अधिक छायाचित्रे पाठवून स्पर्धेत सहभाग नोंदविला. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफीचे संचालक राजन चौगुले, प्रा. मधुसूदन तावडे व मयूरेश मोघे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून, संस्थेचे कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. संस्थेने तीन वर्षांचे बी.ए. ऑनर्स, व्यावसायिक फोटोग्राफी व फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफी छायाचित्रण पदवी असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. स्पर्धेतील छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या रविवारपासून (ता. १२) मंगळवार (ता.१४) पर्यंत येथील बालगंधर्व कलादालनात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत भरविण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aashadhi Wari Photo Competition Mukund Parkhe First