#Saathchal भागवत पताका फडकावून ‘साथ चल’ दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 July 2018

‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक छाब्रिया साथ चल दिंडीत सहभागी झाले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साथचल दिंडीत सहभाग नोंदवला व शपथ घेतली. आपल्या आई-वडिलांसाठी साथचल दिंडीत चालण्यासाठी निगडी, आकुर्डी, पिंपरी येथील नागरिक मोठ्या संख्येने तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होते. 

पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली. 

‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक छाब्रिया साथ चल दिंडीत सहभागी झाले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साथचल दिंडीत सहभाग नोंदवला व शपथ घेतली. आपल्या आई-वडिलांसाठी साथचल दिंडीत चालण्यासाठी निगडी, आकुर्डी, पिंपरी येथील नागरिक मोठ्या संख्येने तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होते. 

saathchal

‘वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या सेवेची’ या संकल्पनेवर आधारित ‘साथ चल’ दिंडीचा प्रारंभ निगडीतील भक्ती-शक्ती चौकात झाला. ‘साथ चल’ दिंडीला संत तुकाराम महाराज संस्थान देहू आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान आळंदी (देवाची) यांचे विशेष सहकार्य लाभले. ‘सकाळ’चे संचालक भाऊसाहेब पाटील यांनी काल (ता.6) सोहळ्याचे स्वागत केले. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘साथ चल’ दिंडी सहभागी होती. त्यात सर्वांत पुढे भगव्या पताकाधारी होते. टाळ-मृदंगांचा गजर आणि मुखाने नामस्मरण करीत देहू येथील पंचमवेद वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी चालत होते. त्यापाठोपाठ ज्ञानदीप विद्यालय व अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालय, मामुर्डी येथील माई बालभवन व नॉव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी चालत होते. त्यांच्या मागे विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी होते. 

आमचाही होता सहभाग
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री प्रियंका यादव, टाटा मोटर्स कामगार संघटना, एसकेएफ इंडिया कामगार संघटनांचे प्रतिनिधी, साहित्य संवर्धन समिती, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, साहित्य मंच व साहित्यिकांची प्रबोधन दिंडी, डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल अकादमीचे संस्थापक डॉ. नंदकिशोर कपोते, यमुनानगर महिला मंडळ, लोकमान्य व पवना रुग्णालयांचे पथक, प्रा. रामकृष्ण मोरे व डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी, माई बालभवनच्या संचालिका प्रतिज्ञा देशपांडे व सहकारी, पंचमवेद वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान महाराज जाधव, नॉव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रा. वैभव फड व सहकारी, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलिस नागरिक मित्र, डॉक्‍टरांच्या निमा संघटनेचे पदाधिकारी, पर्यावरण संवर्धन समिती, नादब्रह्म परिवाराचे डॉ. रवींद्र घांगुर्डे, इनरव्हील क्‍लब तळेगाव दाभाडे, लायन्स क्‍लब देहूरोड, फुले- शाहू- आंबेडकर विचारमंच देहूरोड. ‘साथ चल’ दिंडीला प्रमोद कुटे मित्रमंडळ, विठ्ठल मंदिर विश्‍वस्त आकुर्डी यांचे सहकार्य लाभले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #saathchal Dindi very good response to saathchal dindi starting today