#SaathChal संत सोपानदेवांच्या पालखीवर पुष्पवृष्टी

कळंब (ता. इंदापूर) - संत सोपानदेव महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करताना ग्रामस्थ.
कळंब (ता. इंदापूर) - संत सोपानदेव महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करताना ग्रामस्थ.

वालचंदनगर - कळंब (ता. इंदापूर) येथे संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यावर युवकांनी पुष्पवृष्टी करून पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा लासुर्णे येथील मुक्कामानंतर कळंब गावामध्ये आला. मंगळवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगेश डोंबाळे मित्र परीवारातर्फे युवकांनी सोहळ्यातील वारकरी व पालखी रथावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. गावामध्ये पालखी येताच सरपंच उज्‍ज्वला फडतरे, पंचायत समिती सदस्या शैला फडतरे,  सुहास डोंबाळे, अप्पासाहेब अर्जुन, रामचंद्र कदम, तलाठी विलास भोसले यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी शिवसनेचे योगेश कणसे यांनी वारकऱ्यांना ‘सकाळ’च्या अंकाचे, काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी फळे व केळीचे वाटप केले. निमसाखरमध्ये पालखी दुपारचा विसावा झाला. या वेळी सरपंच अरुणा चव्हाण, गोविंद रणवरे, विजयसिंह रणवरे, नंदकुमार पाटील, वीरसिंह रणसिंग, रवींद्र रणवरे, जयकुमार कारंडे, अनिल रणवरे यांनी स्वागत केले. निरवांगीमध्ये सरपंच रेखा माने, माजी सरपंच दशरथ पोळ, दत्तात्रेय पोळे, शंकर शेंडे यांनी स्वागत केले. आज (ता. १८) पालखी सोहळा अकलूजच्या (सोलापूर) मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com