#saathchal वरुणराजाच्या आगमनाने वारकऱ्यांची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 July 2018

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतून 6 जुलैला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारी काळात प्रस्थान सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी तसेच आळंदी ते पंढरपूर पायी वारी पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी समर्पित करण्यासाठी वारकऱ्यांचे आगमन आळंदीत सुरू झाले आहे.

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान वारीत हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांचे आगमन सुरू झाले आहे. वारकऱ्यांच्या आगमनाबरोबर वरूणराजानेही हजेरी लावल्याने आळंदीकर सुखावले. मात्र पावसापासून बचावासाठी सोय नसल्याने नदीच्यापलिकडे दर्शनाच्या रांगेतील भाविकांना आज वरूणाराजाचे जलस्नान झाल्याने थोडीसी तारांबळ उडाली.

aalandi

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतून 6 जुलैला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारी काळात प्रस्थान सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी तसेच आळंदी ते पंढरपूर पायी वारी पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी समर्पित करण्यासाठी वारकऱ्यांचे आगमन आळंदीत सुरू झाले आहे. ठिकठिकाणी तंबू आणि धर्मशाळामधून वारकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे.  धर्मशाळांमध्ये ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम सुरू आहेत.

aalandi

सध्या आळंदीतील माउली मंदिरात समाधी दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी होवू लागली. आज दर्शनाची रांग इंद्रायणीवरिल भक्ती सोपान पूल ओलांडून नदीपलिकडे गेली होती. भर पावसातही वारकऱ्यांचा दर्शनासाठीचा उत्साह कायम होता. दरम्यान आज सकाळपासूनच पावसाची रीपरीप सुरू होती. मधूनच ऊन पडत होते. मात्र दुपारी बारानंतर अधूनमधून मोठा पाउस पडल्याने दर्शनाच्या रांगेतली भक्ती सोपान पूलावरील आणि नदीच्या पलिकडील भाविकांना पावसापासून संरक्षणासाठी सोय नसल्याने भिजावे लागले. दर्शनासाठी रांगेत उभे राहून भिजलेल्या अंगानेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर शहरात इतरत्र वारकऱ्यांनी पावसापासून बचावासाठी दुकानांच्या शेडचा आसरा घेताना दिसत होते. दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त रुजू झाला असून पोलिस उपविभागिय अधिकारी राम पठारे आणि आळंदीतील सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रेय दराडे यांनी हा बंदोबस्त सांभाळला आहे. 

police aalandi

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #saathchal warkari faced trouble because of rain in aalandi