पुणे : महिला सरपंचच्या पतीला कारने उडविण्याचा प्रयत्न करणारे अटकेत

3arrested_54.jpg
3arrested_54.jpg

पुणे : नर्हे गावच्या महिला सरपंचाच्या पतीला कारने उडवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघाना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

बाळासाहेब वनशीव असे जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. अविनाश कैलास कांबळे (वय 39, रा. नरहे ) व नीतीश सतीश थोपटे (वय 30, रा. धायरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

ग्रामपंचायत निवडणुकित सरपंच पदावरुन झालेली भांडणे आणि जमीनीबाबतच्या जुन्या वादावरुन आरोपी कांबळे याने वनशिव हे पहाटे फिरायला गेले असताना त्यांना कारने उडवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत वनशिव गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी वनशिव यांच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com