मेहुणी आणि साडूमुळेच मी करतोय आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

कोर्टात दुसरा विवाह करुन सोळा दिवसांनंतर व्हाट्स अॅपवर स्टेटस ठेवून तरूणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ''माझ्या मृत्यूस साडू व मेव्हणी जबाबदार'' असल्याचे स्टेटस त्याने व्हाट्सअॅपवर याप्रकरणी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे  : कोर्टात दुसरा विवाह करुन सोळा दिवसांनंतर व्हाट्स अॅपवर स्टेटस ठेवून तरूणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ''माझ्या मृत्यूस साडू व मेव्हणी जबाबदार'' असल्याचे स्टेटस त्याने व्हाट्सअॅपवर याप्रकरणी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चांद रफिक शेख ( वय २८ ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील रफिक खलील शेख ( वय ५०, रा. तारमळा, थेऊर, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चांद याचा साडू अकबर शेख व मेहुणी सुमैय्या ईब्राहिम सय्यद ( दोघे रा. सखाराम नगर, थेऊर) यांचे विरोधांत चांद यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद याचे पहिले लग्न झाले होते. काही कारणांमुळे तीन वषार्पूर्वी त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर सखाराम नगर, थेऊर येथे राहत असलेल्या सना या तरूणीशी २५ जूनला पुणे येथील न्यायालयात विवाह केला होता. थेऊर येथील राईज अ‍ॅण्ड शाईन कंपनीतील प्रयोगशाळेत बुधवार (ता. ३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे  कामाला गेला होता. त्यादिवशी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याचा साडू व मेव्हणी हे त्यांचे घरी गेले. सना हिची आई  खूप आजारी आहे. तिला दोन दिवसांसाठी पाठवा असे सांगितले. यांवर रफिक शेख यांनी चांद आल्यानंतर घेऊन जा, असे सांगितले. परंतू त्यांनी काही एक न ऐकता तिला घेऊन गेले. सायंकाळी घरी आल्यानंतर चांदला ही बाब समजताच, तो सनाच्या घरी गेला. त्यावेळी त्यालाही तिच्या नातेवाईकांनी दोन दिवसांनी पाठवतो असे सांगितले होते. त्यानंतर चांद पत्नीला आणण्यासाठी वेळोवेळी तिचे घरी गेला परंतू त्याला तिला भेटू देत नव्हते. त्याला घरांत घेत नसत. 

त्यानंतर मोबाईलवर ''मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस माझा साडू अकबर व मेव्हणी सुमय्या जबाबदार आहे''असे स्टेटस ठेवले. काही वेळाने गणेश कुंजीर यांनी फोन वरुन चांद याने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे रूळावर मिळून आला. पोलिसांनी त्याच्या मृत्यूची अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Man committed suicide in pune