पाऊण कोटी खर्चूनही सीमाभिंतीला घरघर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी : आकुर्डी प्राधिकारणातील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सीमाभिंतीच्या डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी सन 2015 च्या अखेरीस महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाऊण कोटीच्या निविदेकरिता मंजुरी देण्यात आली आणि 2017 मध्ये सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. त्या काळात काही जागरूक नागरिकांकडून सदरच्या कामाकरिता आक्षेपही घेण्यात आला. कारण दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे हे लक्षात येत होते. जुनी सीमाभिंतही अनेक वर्षांपासून सुस्थितीत उभी होती. दगडी बांधकाम चांगल्या स्थितीत होते.

वाल्हेकरवाडी : आकुर्डी प्राधिकारणातील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सीमाभिंतीच्या डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी सन 2015 च्या अखेरीस महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाऊण कोटीच्या निविदेकरिता मंजुरी देण्यात आली आणि 2017 मध्ये सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. त्या काळात काही जागरूक नागरिकांकडून सदरच्या कामाकरिता आक्षेपही घेण्यात आला. कारण दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे हे लक्षात येत होते. जुनी सीमाभिंतही अनेक वर्षांपासून सुस्थितीत उभी होती. दगडी बांधकाम चांगल्या स्थितीत होते. परंतु टक्केवारीचे राजकारण आणि महापालिका प्रशासनाची भ्रष्टाचारी वृत्ती यामुळे सेक्टर 28 मधील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या मजबूत दगडी भिंतीला नजर लागली.

आता पाऊण कोटी खर्चून नूतनीकरण करून उभ्या केलेल्या सीमाभिंतीस वर्ष पूर्ण होण्याच्या आतच घरघर लागली आणि आता उत्तरेकडील बाजू ढासळण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी सिमेंट वाळूची कमतरता तर काही ठिकाणी फक्त बाह्य बाजूला दिसणाऱ्या दर्शनी भागाचे पेंटिंग करून 75 लाख रुपयांचे बिलही प्रशासनाकडून मंजूर करून घेतले. कोणत्याही प्रकारचे अंतिम निरीक्षण न करता कररूपी लाखो रुपयांची खैरात सर्व तथाकथित ' चेन ' मधील मंडळींना पालिकेकडून करण्यात आली आहे असे प्राधिकरण कृती समितीच्या निदर्शनास आले. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या शिष्टमंडळाने उद्यानाच्या जुन्या भिंतीचे निरीक्षणही प्रत्यक्षात केले होते समितीचे अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, अमित डांगे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्याबाबत तश्या योग्य सूचनाही तात्काळ मुख्य अभियंता एम टी कांबळे, संजय कांबळे यांना दिल्या होत्या. 

अंदाजे 9 एकर परिसरात असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान प्राधिकरणातील रोप्य महोत्सव साजरा करणारे जुने उद्यान आहे. त्यामध्ये शहरातील एकमेव नक्षत्र वाटिका अस्तित्वात आहे.त्या वाटिकेचे आणि औषधी वनस्पतींचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे.सदरच्या सीमाभिंतीच्या कामाची चौकशी करून दोषी व्यक्तींना दंड तसेच शिक्षा होणे आवश्यक आहे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सदरची बाब गांभीर्याने घ्यावी." 
- विजय पाटील, प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती

 

Web Title: पाऊण कोटी खर्चूनही सीमाबंदीला घरी